मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. धुळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. धुळे

 मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. धुळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः दिल्ली येथील मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या राष्ट्रीय संघटनेच्या महिला विभाग अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या व स्वाभीमानी मराठा महासंघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष सौ.अर्चना धुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक डॉ.सतीश केदारी यांनी सौ.अर्चना धुळे यांना नियुक्ती पत्र देऊन निवड जाहिर केली. नियुक्ती पत्र मिळाल्याने सौ.अर्चना धुळे यांनी पदभार स्विकारला आहे. मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व कायदा सल्लागार अ‍ॅड.एल.टी.सावंत व प्रदेश अध्यक्ष हभप रिंधे महाराज यांनी निवड बद्दल अर्चना धुळेंना शुभेच्छा दिल्या. सौ.अर्चना धुळे या विद्यार्थीदशेपासून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर आहेत. देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन ही राष्ट्रीय संघटना परिश्रम घेत आहे. संघटनेचे कार्य नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे करताना अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढा देवून समाजाच्या सर्व स्तरामधील महिला व नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत जिल्ह्यामधील महिलांचे संघटन मजबूत करण्यात येईल. जिल्ह्यात भ्रष्टाचाराबाबत तक्रार असल्यास 8999639373 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सौ.अर्चना धुळे यांनी केले आहे.

सौ. अर्चना धुळे यांची मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनच्या महिला विभाग अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध महिला संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment