प्रवरा नदीपात्रात अनोळखी युवकाचा मृतदेह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

प्रवरा नदीपात्रात अनोळखी युवकाचा मृतदेह

 प्रवरा नदीपात्रात अनोळखी युवकाचा मृतदेह

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीरामपूर ः  प्रवरा नदीपात्रात अनोळखी युवकाचे प्रेत आढळून आले असुन प्रवरा नदीच्या पुलावर एक दुचाकी सापडली आहे. दुचाकीला असलेल्या कागदपत्रावरुन संबधित युवकाची ओळख पटली आहे.
बेलापुर येथील प्रवरा नदी पात्रात अनोळखी इसमाचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना काही व्यक्तींनी पाहिले. त्यांनी तातडीने बेलापूर पोलिसांना तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवले. बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके, पोलिस काँन्स्टेबल पोपट भोईटे, उपसरपंच अभिषेक खंडागळे, रमेश अमोलिक, देविदास देसाई, किशोर कदम तातडीने घटनास्थळी पोहोचले. याच दरम्यान प्रवरा नदीवरील पुलावर एक मोटारसायकल उभी असल्याची माहिती मिळताच हवालदार अतुल लोटके, माजी सरपंच भरत साळुंके, देविदास देसाई, किशोर कदम यांनी प्रवरा नदीवरील पुलावर जावुन गाडीची पहाणी केली.  या दुचाकीला असलेल्या कागदपत्रांवरून संबंधित युवकाचे नाव शंकर उत्तम गलांडे असल्याचे समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here