श्रीगोंदा रयत संकुलात विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

श्रीगोंदा रयत संकुलात विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

 श्रीगोंदा रयत संकुलात विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा शहरातील रयत संकुलामध्ये चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे धोरण रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस यांनी आढावा बैठकीत जाहीर केले.
चालू शैक्षणिक वर्षात र्लेींळव-19 या महामारी चा विचार करता अनेक मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लॉकडाऊनमुळे शाळांचे कामकाज ऑनलाइन चालू होणार आहे. सर्वसामान्य पालकांना आपला मुलगा चांगल्या शैक्षणिक संकुलात शिकवण्याची इच्छा असते. परंतु प्रवेश फी मुळे मुलांचा प्रवेश इतर ठिकाणी होतो. चालू शैक्षणिक वर्षात सेमी व मराठी माध्यमांच्या सर्व वर्गांचा प्रवेश रयत संकुलाने मोफत देऊन मुलांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचे काम केलेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या व कर्मवीर भाऊराव पाटलांच्या धोरणानुसार सर्व वर्गांचे प्रवेश मोफत देण्याचा निर्णय झाला.
दिनांक 15 जून पासून सर्व वर्गांचे ऑनलाईन अध्यापन ’झूम प’ द्वारे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. सर्व स्पर्धा परीक्षांचे तास घेण्यासाठी दररोज ऑनलाईन सराव चाचण्या घेण्याचे ठरले. जोपर्यंत शाळा प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत रयत रोझ प्रकल्प, गुरुकुल प्रकल्प, वोडाफोन स्पोकन इंग्लिश अशा विविध उपक्रमाद्वारे रयत मधील विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे राबविण्याचे पूर्ण नियोजन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यातील संकुलाने केलेले आहे, म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात मोफत प्रवेश घेऊन आपण निश्चिंत राहा असे आवाहन जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर यांनी केले.
रयतच्या संकुलातील महादजी शिंदे विद्यालय व श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात स्पर्धा परीक्षांची उज्वल यशाची परंपरा असून गरीब विद्यार्थ्यांना एन.एम.एम. एस., स्कॉलरशिप, नवोदय, आर .टी. एस. , एन.टी.एस. सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते त्यातून आत्तापर्यंत जवळ जवळ एक कोटी रुपयांची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळत आहे. उत्तर विभागात श्रीगोंदा संकुलाचे स्पर्धा परीक्षेचे निकाल उत्कृष्ट आहेत, अशी माहिती प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी दिली. गुणवंत मूले घडवण्यासाठी रयत संकुल अतिशय महत्त्वाची भूमिका सर्व शिक्षकांच्या मदतीने पूर्ण करतात, अशी माहिती मुख्याध्यापिका वंदना नगरे यांनी दिली.
या आढावा बैठकीत सेवानिवृत्त शिक्षक बी के राहिंज व मोहन ससाने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला व त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या आढावा बैठकीस स्कूल कमिटी सदस्य रविकांत दंडनाईक , ज्योत्स्ना  भंडारी, सौ. लोखंडे, उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, गीता चौधरी, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत, दिलीप भुजबळ, गुरुकुल प्रमुख विलास लबडे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर, संतोष शिंदे, सुधाकर जानराव, के डी शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत दरेकर तर राजेंद्र खेडकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment