पोटे दांपत्यानी पाठपुरावा करून विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये निधी मिळविला : मा.आ.जगताप
14 व्या वित्त आयोगातील विकास कामे अंतर्गत भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ..
नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कोरोना काळात इतर विकास कामांना कात्री लागत असतानाही श्रीगोंदा नगरपालिका नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे, गटनेते मनोहर पोटे यांनी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे जिह्यातील मंत्री,तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते यांच्या मदतीने नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये निधी मिळविला भविष्यात देखील निधी मिळवू आणि शहर विकसित करू असे माजी आमदार तथा जिल्हा बँक संचालक राहुल दादा जगताप यांनी शहराजवळील शिक्षक कॉलनी येथील भूमिगत गटार योजना शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
14व्या वित्त आयोगातील विकास कामे अंतर्गत भूमिगत गटार योजना शुभारंभ राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी स.म.शिवाजीराव नागवडे सह.साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे होते. तर आ.बबनराव पाचपुते,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, दीपक भोसले, हरिदास शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मा आ.जगताप म्हणाले कोरोना काळात ग्राम पंचायतीला निधी आलेला परत जाण्याची वेळ आली विकास कामांना कात्री लावण्यात आली पण पोटे दाम्पत्याने शहर विकासासाठी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले या भागात रस्ते साठी निधी मिळविला, गटारीचा प्रश्न मार्गी लागला. राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की पोटे दाम्पत्य सर्व नेते, सर्व नगरसेवक यांना विकास कामात बरोबर घेऊन काम करत आहेत कोरोना काळात देखील शहर विकास कामे सुरू आहेत. तर आ.बबनराव पाचपुते यांनी निधी मिळत आहे कामे करा सर्वांना बरोबर घ्या असे सांगितले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे,संतोष खेतमाळीस,नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे, नगरसेवक गणेश भोस,राजू लोखंडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment