श्रीगोंदा येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करणेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

श्रीगोंदा येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करणेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 श्रीगोंदा येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करणेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः तालुक्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत श्रीगोंदा पोलीसांनी शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे यांच्या मार्गदर्शनखाली सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक आयोजित केली होती.
या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, पो नि रामराव ढिकले, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, मुख्याधिकारी मंगेश देवरे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी जगताप, प्रशांत गोरे, पो उप नि अमितकुमार माळी हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना गोरडे यांनी सांगितले की सध्या सर्वांच्या जवळ अँड्रॉइड फोन आहेत याच फोनच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत आपल्या परीसरात कुठलीही अनुचित घटना घडली असता त्याबाबत माहिती द्यायची असेल,बकुणालाही कोणतीही मदत हवी असेल तर आता फक्त एका फोन कॉल वर ही मदत तात्काळ मिळू शकते.ग्रामसुरक्षा यंत्रणा आपल्या गावात कशी कार्यान्वित करायची याबाबत नाशिक येथील या यंत्रणेचे संचालक गोरडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य  यांना मार्गदर्शन करत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे माहिती दिली. ही यंत्रणा गावोगावी कार्यान्वित झाल्यानंतर चोरी, दरोडा,आग,जळीताच्या घटना,लहान मुले हरवणे,शेतातील पिकांची चोरी,वन्यप्राणी हल्ला,गंभीर अपघात,पूर,भूकंप यासारख्या  आपत्तीच्या घटनांमध्ये एकाचवेळी सर्व गावाला सूचना देणे,सावध करणे अथवा एकाचवेळी सर्वाना मदतीसाठी बोलावता येणे शक्य होणार असल्याची माहिती दिली.

No comments:

Post a Comment