काष्टी येथे आदिवासी कुटुंबाना शिधा वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

काष्टी येथे आदिवासी कुटुंबाना शिधा वाटप

काष्टी येथे आदिवासी कुटुंबाना शिधा वाटप 


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे      मानवाधिकार फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने 70 निराधार, अंध अपंग, मोलमजुरी करणारे, आदिवासी तसेच लॉकडाऊन मुळे रोजगार नसलेल्या कुटुंबाना  किमान पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधाचे वाटप मा. मंत्री आ.बबनरावजी पाचपुते  यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये पाच किलो गहू आटा, तीन किलो तांदूळ, एक किलो डाळ,एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो तेल, एक किलो मीठ, पावशेर चहा पावडर व मास्क, सनिटाझर इत्यादी साहित्याचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी  आ. बबनराव पाचपुते  यांच्या समवेत  मानवाधिकार फाउंडेशनचे जिल्हाउपाध्यक्ष  सुनिल मुरलिधर शिंदे, सरपंच  सुनील  पाचपुते  माजी पंचायत समिती सदस्य    राजेंद्र पाचपुते  लालासाहेब फाळके, सदस्य मेजर चांगदेव  पाचपुते, जालिंदर  पाचपुते, ड. महेश लगड, ड. गोरख कोकाटे, ड. रणजीत शिरोळे तसेच  विकास पाचपुते, .संतोष कोकाटे, वैभव खंडागळे, केतन ढवळे, प्रतीक जगताप, जीवन शिपलकर, शरद पवार इत्यादी सामजिक कार्यकर्ते  आणि लाभार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी पारित केलेल्या कोव्हिड 19 बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष   सुनील शिंदे वा अनिल पाचपुते यांनी केले होते.

No comments:

Post a Comment