लोकनेते केंद्रीयमंत्री स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृतींना गोपीनाथ गडावर अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

लोकनेते केंद्रीयमंत्री स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृतींना गोपीनाथ गडावर अभिवादन

 लोकनेते केंद्रीयमंत्री स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मृतींना गोपीनाथ गडावर अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः परळी ( जि. बीड ) येथे गोपीनाथ गडावर लोकनेते आणि केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथजी मुंढे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंढे, खासदार सुजयदादा विखे पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आ. मेघनाताई बोर्डीकर, आ. मोनिकाताई राजळे, खा. भागवत कराड, खा. डॉ. प्रीतमताई मुंडे, आ. नमिताताई मुंदडा, माजी मंत्री सुरेश धस, अहमदनगरचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, अभय आव्हाड, अजय रक्ताटे सह कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच लोकनेते गोपीनाथजी मुंढे साहेब यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल कार्ड काढले असून त्याचे ऑनलाईन विमोचन नवी दिल्ली येथे करण्यात आले. सदर कार्यक्रम गोपीनाथ गडावर (व्हर्चुअल) ऑनलाइन द्वारे करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here