कै.दादा लिंबाजी कोळपे यांच्या स्मरणार्थ 100 औषधी वृक्षांचे रोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

कै.दादा लिंबाजी कोळपे यांच्या स्मरणार्थ 100 औषधी वृक्षांचे रोपण

 कै.दादा लिंबाजी कोळपे यांच्या स्मरणार्थ 100 औषधी वृक्षांचे रोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः वनविभाग कर्मचारी संस्था पुणे जिल्हा चेअरमन कै.दादा लिंबाजी कोळपे यांचे 15 मे 2021 रोजी निधन झाले. यांनी जीवनभर संघर्ष करत जनतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. गोरगरीब व सर्वसाधारण लोकांच्या गळ्यातील ताईत बनले त्याचे कारण म्हणजे दादानी लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले होते जसे एखादा वृक्ष सर्वांसाठी समान छाया, फळे देतो त्याचप्रमाणे कै.दादा लिंबाजी कोळपे  यांनी लोकांना एकाकी कधीही वाटू दिले नाही. दि. 15 जून 2021 रोजी कै.दादा लिंबाजी कोळपे यांच्या मरनाअर्थ  लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदारा कोळपे वस्ती येथे ग्रीन फाउंडेशन माध्यमातून जंगली वृक्ष- वड, पिंपळ, कडूनिंब, फणस, आबा, बिटी, चिंच, इलायची चिंच, उंबर, आवळा अशा विविध औषधी व जंगली वृक्षाचे रोपन केले.
यावेळी वन विभाग लोणी काळभोर, लोणी काळभोर ग्रामस्थ, धनगर समाज सेवा संस्था , श्री.बाळासाहेब कोळपे, दत्तात्रय शेंडगे, भाऊसाहेब कोळपे, भानुदास कोळपे, मल्हारी तात्या कोळपे, जालिंदर आण्णा रूपनर, दत्तात्रय चोरमले, युवराज दुबे, दादा कोळपे, धोंडिबा कोळपे, हेमंत कोळपे, विजय कोळपे, युवराज रूपनर, अमित जगताप, जीवन जाधव उपस्थित होते.
यावर्षी आपणा सर्वांनाच  वृक्षारोपणा च्या उपक्रमांसाठी आवाहन केले आहे. जेणेकरून  निसर्गाचा ही समतोल राखला जाईल व कोळपे दादाप्रती आपली असलेली भावना ही दृढ होईल हे निश्चित असल्याचे दत्तात्रय शेंडगे यांनी सांगितले आहे. कै.दादा लिंबाजी कोळपे  यांना वन विभाग लोणी काळभोर व ग्रीन फाउंडेशन, धनगर समाज सेवा संस्था पुणे च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने निसर्ग हिताचे व समाजहिताचे कार्य करत उपक्रम राबवीन्यात आला व ते सर्व झाडे जोपासन्याची शपत घेण्यात आली. काळाची पावले ओळखून तरी निसर्गाची जोपासना करा तसेच मरनाअर्थ हीच खरी दादाप्रती आदरांजली होय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here