राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी, चाचण्यांचा आलेख वाढला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी, चाचण्यांचा आलेख वाढला

 राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या कमी, चाचण्यांचा आलेख वाढला


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी चाचण्याचा आलेख मात्र वाढलेला असून एका महिन्याच्या आतच तब्बल 26 हजार जणांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या असून आज अखेर तालुक्यामध्ये 90 हजार जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
गेल्या सात दिवसातील पॉझिटिव रेट घसरत केवळ दोन टक्क्यावर आले आहेत. राहुरी शहरासह तालुक्यात 25 हजार 197 जनाच्या ीीं-लिी घेण्यात आल्या तर रॅपीड अँटिजेन 47 हजार 357 जणांची चाचणी करण्यात आली. खाजगी हॉस्पिटल मध्ये 17 हजार 335 जणांची आपली कोरोना टेस्ट करून घेतली. आजअखेर एकूण 89 हजार 889 जनाची कोरोना चाचणी झाली आहे. त्यातील 13 हजार 437 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 247 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . एकूण रिकवरी रेट 96 टक्के इतका आहे .
मे महिन्यात कोरोना चाचण्यांचा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निर्देशानुसार वाढवण्यात आल्या .
गेल्या महिनाभरात 26 हजार चाचण्या घेण्यात आल्या मागील सात दिवसात 7 हजार कोरोना टेस्ट झाल्या . त्यात 144 पॉझिटिव्ह आढळून आले . हा पॉझिटिव्ह रेट केवळ दोन टक्के असल्याची माहिती राहुरी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह संख्या ही कमी होत असल्याचे अनलॉक च्या निर्णयाप्रमाणे राहुरी तालुक्यातील दुकानदाराचे व्यवहार शासकीय नियमाचे पालन करून सुरळीत होत आहेत. तरीही बाजार पेठ यामध्ये गर्दी दिसून येत आहे .चाचण्या वाढवल्या रुग्ण संख्या कमी होत आहे मात्र नागरिक एक छोट्या मोठ्या व्यवसायिकाची आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घेताना सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment