तुम्ही, वाड्यावर बसून हस्तक्षेप का करता? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

तुम्ही, वाड्यावर बसून हस्तक्षेप का करता?

 तुम्ही, वाड्यावर बसून हस्तक्षेप का करता?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोफत लस दिली.
खा. विखेंचा राज्यमंत्री तनपुरेना टोला.


राहुरी -
अहमदनगर जिल्ह्यामध्ये लसीकरणावरून राहुरी तालुक्यामध्ये सतत वादंग होत आहे. खरंतर प्रशासकीय अधिकार्‍यांनी कुठल्याही मंत्र्यांच्या दबावाला बळी न पडता काम करावे. हे लसीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या लसीकरणामध्ये राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी वाड्यावरून हस्तक्षेप करू नये. त्यांनी स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेस लसीकरण उपलब्ध होईल व त्या देण्यास सुरुवात होईल, त्यावेळेस वाड्यावर बसून लसीकरणाचं वाटप केलं तरी आम्ही मात्र, कुठेही हस्तक्षेप करणार नाही. असा टोला ना. प्राजक्त तनपुरे यांना खासदार डॉ.सुजय विखे यांनी लगावला.
खा.डॉ.विखे यांनी राहुरी तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुरी कृषी विद्यापीठ येथे अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार विखे यांनी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये असणार्‍या कोव्हिड सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी असणार्‍या रुग्णांची विचारपूस केली. लसीकरण सुरू असताना कुठल्याही नागरिकाची कोणत्याही प्रकारे कोरोना चाचणी न करता त्यांना लस देण्यात यावी. केंद्र सरकारचा तसा कुठलाही आदेश नसताना तुम्हाला कोरोना चाचणी करण्याचे आदेश कुणी दिले? आपल्याकडे तसे लेखी पत्र आहे का? असे यावेळी खा.विखे यांनी विचारले असता प्रशासकीय अधिकार्‍यांना यावर काहीच उत्तर देता आले नाही. खा.विखे म्हणाले, मी सांगेल तोच आदेश महत्त्वाचा आहे. विनाकारण कोणाचीही कोरोना चाचणी करू नका. ज्याला त्रास होत असेल अशा नागरिकांची चाचणी केली तर त्यात काही वावगे होणार नाही. यावेळी प्रांताधिकारी दयानंद जगताप, राहुरी तहसीलदार शेख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, राहुरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड, विकास मंडळाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी नगरपालिका विरोधी पक्षनेते दादासाहेब सोनवणे, राहुरी तालुका भाजपाचे अध्यक्ष अमोल भनगडे, पंचायत समिती सदस्य सुरेशराव बानकर, भैय्या शेळके, राजेंद्र उंडे होते.

No comments:

Post a Comment