टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या पाणीपुरवठा योजनेची बैठक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या पाणीपुरवठा योजनेची बैठक

 टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या पाणीपुरवठा योजनेची बैठक

जिल्हा परिषदेमध्ये बैठक; सभापती दाते यांच्या ठेकेदारांना सूचना


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः नळ पाणी पुरवठा योजना टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या तालुका पारनेर या योजनांच्या कामासंदर्भात माननीय काशिनाथ महादु दाते सर सभापती बांधकाम व कृषी समिती जिल्हा परिषद अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली व मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी  जिल्हापरिषद अहमदनगर ,कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा पारनेर, सरपंच/ग्रामसेवक  टाकळी ढोकेश्वर व  कर्जुले हर्या तसेच या दोनहीयोजनेचे ठेकेदार यांचे उपस्थितीत दिनांक 4 जून रोजी जिल्हा परिषद अहमदनगर येथे बैठक आयोजित केली होती
सदर बैठकीमध्ये चर्चेअंती पाणीपुरवठा योजना कर्जुलेहर्या व टाकळीढोकेश्वर या योजनेचे मांड ओहळ येथील उद्धभव विहिरीचे (जॅक वेल) चे काम पूर्ण झाले असून कार्जुलेहर्या योजनेच्या उर्ध्व वाहिनीचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे पूर्ण झाले आहे व जलशुद्धीकरण केंद्रा  पर्यंत चाचणी घेतली असून जलशुद्धीकरण केंद्राचे रंग काम व फिल्टर मीडिया भरणेचे काम काम बाकी असून सदर काम 15 दिवसात पूर्ण करनेच्या सूचना ठेकेदार यांना देण्यात आल्या व वाडी वस्तीवरील पाईपलाईनचे कामे पूर्ण झाली असून वाडी वस्तीवरील जलकुंभ चे जागेचे बक्षीस पत्र करणे बाकी असलेने जळकुंभाची कामे सुरू करता आली नाही त्यावर मा सभापती व मा उप मुख्य. कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच कार्जुलेहर्या यांना या बाबत पाठपुरावा करून  जलकुंभ जागे बाबत   लवकरात लवकर ग्रामपंचायत यांचे मार्फत कार्यवाही करणे बाबत सांगितले व ठेकेदार यांनी जागा उपलब्ध झाले नंतर तात्काळ जलकुंभाची कामे सुरू करून पूर्ण करावी  तसेच सरपंच कार्जुले हर्या यांनी गावातील अतिरिक्त वितरण व्यवस्था करणे बाबत निदर्शनास आणून दिले त्या बाबत योजनेतील बचत रकमेतून सदर कामे करावीत असे सर्वानुमते ठरले व त्या बाबत चा प्रस्ताव मा कार्यकारी अभियंता यांना सादर करावा तसेच मांड ओहळ येथील वीज जोडणी करणे चे काम ग्रामपंचायत कार्जुलेहर्या यांनी करून घेण्यात यावे जेणेकरून योजना कार्यान्वित करण्यास अडचणी येणार नाहीत तसेच  पाणी शुद्धीकरण  करण्यासाठी लागणारे साहित्य(टी.सि. एल.व इतर केमिकल) याची उपलब्धता करण्यात यावी
याबाबत सर्व चर्चेअंती ठेकेदाराने  योजनेतील अपूर्ण कामे तात्काळ सुरू करून योजना पूर्ण करून गावठान अंतर्गत पाणी पुरवठा चालू करावा  व ऑगस्ट अखेर  उर्वरीत सर्व कामे पूर्ण करावीत असे आदेश देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here