पाडळी दर्या येथे मृतावस्थेत आढळले हरीण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

पाडळी दर्या येथे मृतावस्थेत आढळले हरीण

 पाडळी दर्या येथे मृतावस्थेत आढळले हरीण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यामधील पाडळीदर्या गावामधे पंढरीनाथ खोसे यांच्या ओंडगा या मळ्यामधील शेतामधे, आज दुपारी 12 वाजता एक हरीण मृतावस्थेमधे आढळले आहे.
शेतकरी पंढरीनाथ खोसे यांनी दुरध्वनीवरुन सदर घटनेची माहीती पारनेर वनविभागाला कळविली.घटना समजताच वन विभागाचे वनरक्षक यु.के. खराडे, वनपाल एन एस जाधव,वनमजुर वाघमारे,यांनी घटना स्थळी भेट देत पाहणी केली.हरीनाच्या गळ्याला अज्ञात प्राण्याने चावा घेतल्याने हरणाचा मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वडझिरे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ओहोळ यांनी हरणाचे शव विच्छेदन केले असुन,वडझिरे येथे मृत हरणावर अंतिम संस्कार करण्यात आले. पुढील तपास पारनेरच्या वनसंरक्षक अधिकारी सिमा गोरे यांच्या मार्गदर्शना खाली वनरक्षक यु.पी.खराडे हे करत आहेत.या प्रसंगी ग्रामस्थही  हजर होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here