‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स,कडुन आ. लंकेंना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स,कडुन आ. लंकेंना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र

 ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स,कडुन आ. लंकेंना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः देशात करोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून सतत दीड  वर्षे करोनाबाधितांच्या सेवेत झोकून दिलेल्या आमदार नीलेश लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’ मध्ये समावेश झाला असल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी दिली. मुंबई येथे होणार्‍या कार्यक्रमात आमदार  लंके यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरवण्यात येणार असल्याचे फराह अहमद यांनी कळवले आहे.
‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये समावेश झाल्याने आमदार लंके यांनी करोना संकटकाळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे. करोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,अभिनेता सोनू सूद यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन’मध्ये यापूर्वीच समावेश झाला आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांंपूर्वी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या सुरुवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार, मजूर, तालुक्यात विलगीकरणात असलेल्या नागरिकांसाठी नगर-पुणे रस्त्यावर आमदार लंके यांनी अन्नछत्र सुरू केले होते.दोन महिने अहोरात्र सुरू असलेल्या या अन्नछत्राचा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला.अन्नछत्राबरोबरच गावाकडे पायी परतणार्‍या मजुरांसाठी आश्रयाची सोय करण्यात आली होती. निर्बंध शिथिल झाल्यावर हजारो मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी आमदार लंके व त्यांच्या सहकार्‍यांनी मदत केली. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्याच्या ग्रामीण भागात करोना संसर्गाने उच्छाद मांडलेला असताना पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात करोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आमदार लंके यांनी तालुक्यातील कर्जुलेहर्या येथे कोविड उपचार केंद्र सुरू केले. या उपचार केंद्रात 4 हजार 668 बाधितांनी करोनावर मात केली.
संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आमदार लंके यांनी भाळवणी येथे 1 हजार 100 खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले आहे. मतदारसंघातील तसेच राज्याच्या विविध भागातील बाधितांबरोबरच परराज्यातील करोनाबाधित भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झाले.आजपर्यंत आठ हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात केली आहे याची दखल ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स,लंडन’या संस्थेने घेतली आहे.

No comments:

Post a Comment