आमदार निलेश लंके यांचे वासुंदे येथील कलाकाराने रेखाटले चित्र - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

आमदार निलेश लंके यांचे वासुंदे येथील कलाकाराने रेखाटले चित्र

 आमदार निलेश लंके यांचे वासुंदे येथील कलाकाराने रेखाटले चित्र

सच्चा कोविड योध्द्याचां सन्मान केला उमद्या चित्रकाराने


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यात भाळवणी येथे श्री. शरदचंद्र पवार साहेब आरोग्य मंदिर या नावाने 1100 बेडचे कोरोना सेंटर उभारून अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना ज्यांनी आधार दिला. असे पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या कामाची दखल वासुंदे गावचे सुपुत्र आणि चित्रकार प्रदीप बबनराव वाकचौरे यांनी घेतली.
त्यांनी आपल्या उत्कृष्ट अशा चित्र शैलीतून त्यांचे सुंदर असे चित्र रेखाटन करुन त्यांच्या कामाची पोचपवती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
कोरोनाच्या काळात लंके साहेबांनी जी रुग्न सेवा केली. त्याची जगाने दखल घेतली आणि प्रतिकात्मक सुपर हिरो आणि जनसामान्य त्यांना सलाम करत आहेत असे या चित्रात दाखवण्यात आले. आहे.चित्र पाहुन आमदार लंके अतिशय खुश झाले.
एका सच्च्या कोविड योध्याचा सन्मान एका उमद्या चित्रकाराने केला यावेळी चित्रकार प्रदीप वाकचौरे जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जालिंदर वाबळे पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, उद्योजक संजय साळुंके, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवा नेते अमोल उगले, दत्तात्रय साळुंके, संतोष साळुंके, अनिकेत झावरे, आदी वासुंदे गावचे ग्रामस्थ देखिल उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here