शील फाउंडेशन आयोजित ’बॅटल ऑफ हुनर’ ऑनलाईन गायन स्पर्धेचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

शील फाउंडेशन आयोजित ’बॅटल ऑफ हुनर’ ऑनलाईन गायन स्पर्धेचा शुभारंभ

 शील फाउंडेशन आयोजित ’बॅटल ऑफ हुनर’ ऑनलाईन गायन स्पर्धेचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
शील फाउंडेशन आयोजित बॅटल ऑफ हुनर ऑनलाईन गायन आज शुभारंभ झाल्याची माहिती संयोजक अजित गोरूले यांनी दिली आहे. ही स्पर्धा म्हणजे कला रसिकांसाठी एक मेजवानी आहे. स्पर्धेसाठी  आपल्या  सुरेल आवाजाचा व्हिडिओ हीींिीं://ुुु.ीहशळश्रर्षेीपवरींळेप.लेा/लरीींंश्रश-ेष-र्हीपरी/ या लिंकवर पाठवावा लागणार आहे. व्हिडिओचा कालावधी हा जास्तीत जास्त 3 मिनिटे असला तसेच आकार 20 एमबी पेक्षा कमी साईजचा व्हिडिओ पाठवावा अशी अट आहे. त्यापेक्षा वरील व्हिडिओची वेळ आणि साईज ग्राह्य धरली जाणार  नासल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. प्रत्येक गायकाला अर्थात स्पर्धकाला स्वतःचा एक व्हिडिओ शूट करून पाठवावा लागणार आहे. दोन स्पर्धक किंवा ग्रुप व्हिडीओ स्वीकारला जाणार नाही. स्पर्धा तीन गटामध्ये असुन वयोगट 7 ते 15 याझसाठी प्रथम पारितोषिक  25000 आणि ट्रॉफी तर द्वितीय पारितोषिक 15000 आणि ट्रॉफी तसेच
तृतीय पारितोषिक 5000 आणि ट्रॉफी असे असेल. वयोगट 16 ते 30 यामध्ये विजेत्याला स्वतःचा स्वतंत्र म्युझिक अल्बम तयार करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामध्ये प्रथम पारितोषिक 50000 आणि द्वितीय पारितोषिक 25000 तर तृतीय पारितोषिक 10000 आहे. तर वयोगट 31 आणि अधिकसाठी प्रथम पारितोषिक 25000 आणि ट्रॉफी तर द्वितीय पारितोषिक 15000 आणि ट्रॉफी तर तृतीय पारितोषिक 5000 आणि ट्रॉफी असेल.
बॅटल ऑफ हुनर स्पर्धेसाठी गायन क्षेत्रातील नामवंत गायक दत्त मेस्री, हर्षवर्धन वावरे, अमोल बावडेकर, सावनी रविंद्र, स्वप्न हुरेकीर हे परीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील. अधिक माहितीसाठी 8097681720/21 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment