नेवाशात रस्त्याच्या कामांची उदयनदादा गडाख यांच्याकडून पहाणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

नेवाशात रस्त्याच्या कामांची उदयनदादा गडाख यांच्याकडून पहाणी

 नेवाशात रस्त्याच्या कामांची उदयनदादा गडाख यांच्याकडून पहाणी

रस्ते व गटारींची कामे दर्जेदार करण्याच्या दिल्या सूचना


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा शहरातील सुरू असलेल्या अंतर्गत  रस्त्याच्या कामांची युवा नेते उदयन गडाख यांनी भेट देऊन पहाणी केली तसेच नेवासा शहराच्या वैभवात भर पडेल अशी दर्जेदार कामे करा अशा सूचना त्यांनी नगरपंचायतचे संबधित अधिकारी व उपस्थित नगरसेवक यांना केल्या.
सद्या लॉकडाऊन सुरू असल्याने नेवासा शहरातील बाजारपेठ व रस्त्यांवर शुकशुकाट आहे.यामुळे नगरपंचायतच्या नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील रस्ते गटारींची कामे करण्यास सुरुवात केली आहे.यात काही ठिकाणी  खडीकरण नंतर डांबरीकरण असे नियोजन होत आहे.या सर्व कामांची पहाणी युवा नेते उदयनदादा गडाख यांनी केली.रस्ते कामे पहाणीच्या वेळी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप,नगरसेवक संदीप बेहळे,नगरसेवक अल्ताफ पठाण,नगरसेवक आसिफभाई पठाण,महेश मापारी, सुलेमान मनियार,व्यापारी हारुण जहागिरदार,रियाज शेख,गणेश कोरेकर, शिवा जंगले,नितीन ढवळे,नामदार शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक सुनील जाधव,राजेंद्र लोखंडे,जयदीप जामदार उपस्थित होते.
नेवासा शहरातील मुख्य पेठेतील काही भाग हा अकरा प्रभागामध्ये येतो या प्रभागाचे नगरसेवक संदीप बेहळे यांनी नगरपंचायत चौक ते संत ज्ञानेश्वर चौक तसेच डॉ.हेडगेवार चौक येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची माहिती उदयन गडाख यांना दिल्या.मुख्य पेठेतील हे रस्ते असल्याने या रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत या दृष्टीने नगरसेवक यांनी स्व:त लक्ष घालवून कामे दर्जेदार कशी होतील यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले तसेच नागरिकांना तत्पर सेवा सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी नियोजन करावे अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिलेल्या भेटी प्रसंगी अधिकारी व उपस्थित नगरसेवक यांना दिल्या.
प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने या भागातील रहिवासी पत्रकार सुधीर चव्हाण तसेच श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी  उदयनदादा गडाख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच प्रभाग 11 तील उर्वरित कामांना गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment