ज्ञानदानाबरोबरच इतर विधायक उपक्रमात योगदान देणारा शिक्षक हा महत्वाचा घटक ः कांगुणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

ज्ञानदानाबरोबरच इतर विधायक उपक्रमात योगदान देणारा शिक्षक हा महत्वाचा घटक ः कांगुणे

 ज्ञानदानाबरोबरच इतर विधायक उपक्रमात योगदान देणारा शिक्षक हा महत्वाचा घटक ः कांगुणे

कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी शिक्षकांच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः प्राथमिक शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व प्राथमिक शिक्षक गुरुकुल मंडळाने शिक्षकांकडून जमा झालेल्या देणगीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करून नुकतेच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांच्याकडे कोविड सेंटर साठी सुपूर्द केले. ज्ञानदानाबरोबरच ईतर विधायक उपक्रमात योगदान देणारा शिक्षक हा महत्वाचा घटकअसल्याचे प्रतिपादन रावसाहेब कांगुणे यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनीही गुरुकुलच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्व शिक्षकांना महसूल प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले.  तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी म्हणाले की, शिक्षक लसीकरणाबाबत सकारात्मक विचार केला जाईल, प्रथमता कोरोना कामकाजाचे आदेश असणार्‍या शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याचा प्रयत्न केला जाईल.  
यावेळी सभापती रावसाहेब कांगुणे,नेवासा पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब सोनवणे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटशिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी,गुरुकुल उच्चाधिकारचे अध्यक्ष नितीन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे ,शिक्षक नेते संदीप जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष भांबरे, विक्रम गोसावी, किशोर जाधव, अमोल काळे, युवराज थोरात आदींनी परिश्रम घेतले.संतोष भांबरे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप जंगले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment