आंतरराष्ट्रीय योगदिनाच्यानिमित्ताने कैलास आंबिलवादे यांनी दिले योगाचे धडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्यानिमित्ताने कैलास आंबिलवादे यांनी दिले योगाचे धडे

 आंतरराष्ट्रीय योगदिनाच्यानिमित्ताने कैलास आंबिलवादे यांनी दिले योगाचे धडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडला होता आणि त्याला इतर देशांच्या पाठींब्यामुळे मान्यतादेखील मिळाली.
भारतीय धर्म संस्कृतीमधे योग हा आजार आणि विकारांवर उपयुक्त  असल्याचे सिद्ध झाले आहे . त्याचबरोबर भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे  मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक  विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे .याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते.  जगभरामध्ये स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीमधील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचा प्रयत्न 21 जून या दिवशी केला जातो. प्राचीन ग्रंथांमध्ये 85 लाख योगासने असल्याचे म्हटले असले तरी सात ते आठ योगासनं जरी केली तरी ते प्रकृतीला फायदेशीर ठरत असल्याचे तसेच जगभरामध्ये पसरत असलेले विविध प्रकारचे आजार तसेच विषाणूंशी लढा देण्यासाठी योगासनांची आवश्यकता असल्याचे परखड मत अ‍ॅड. कैलास अंबिलवादे यांनी व्यक्त करताना योगासनांची प्रात्यक्षिके या वेळी करून दाखवली.

No comments:

Post a Comment