शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्य निर्माण झाले ः इथापे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्य निर्माण झाले ः इथापे

 शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वराज्य निर्माण झाले ः इथापे

राज्यभिषेक दिनानिमित्त जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्थेच्यावतीने अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणार्या आणि दिल्लीपर्यंतही आपल्या कर्तृत्त्वानं शत्रूला थरथर कापायला भाग पाडणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया किती थोर हे लहान-थोरांपासून सर्वांनाच ज्ञात आहे. महाराजांची कारकिर्द ही प्रत्येकाला हेवा वाटेल आणि उर अभिमानानं भरुन येईल अशी आहे. अशाच या कारकिर्दीतील, जीवन प्रवासातील एक दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय. रयतेचे राज्य निर्माण करुन छत्रपती शिवाजी महाराज ‘राजे’ झाले आणि खर्या अर्थाने स्वराज्य निर्माण झाले, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेत शिवराज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे, मराठा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, संचालक ज्ञानेश्वर अनभुले, शहर बँकेचे संचालक संजय घुले, डॉ.विजय कवळे, अशोक वारकड, प्रियंक बेलेकर, रिजवान शेख, ठाकूरदास परदेशी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सतीश इंगळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची कारकर्दी म्हणजे धगधगता इतिहास होय. त्यांच्या या कारकीर्दीती सर्वोच्च क्षण म्हणजे शिवराज्यभिषेक होय. या दिवसाची रयत अनेक दिवसांपासून वाट पाहत होती, आणि रयतेचे राजे शिवाजी महाराज खर्या अर्थाने ‘छत्रपती’ झाले. या थोर महामानव येणार्या अनेक पिढ्यांसाठी नेहमीच आदर्श राहिले.
यावेळी ज्ञानेश्वर अनभुले, संजय घुले आदिंनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. शेवटी व्यवस्थापक अशोक वारकड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here