शिल्पकार बालाजी वल्लाल यांनी साकारली ऐतिहासिक ‘ मुलुख मैदान तोफेची’ प्रतिकृती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

शिल्पकार बालाजी वल्लाल यांनी साकारली ऐतिहासिक ‘ मुलुख मैदान तोफेची’ प्रतिकृती

 शिल्पकार बालाजी वल्लाल यांनी साकारली ऐतिहासिक ‘ मुलुख मैदान तोफेची’ प्रतिकृती

अहमदनगर शहराच्या 531 व्या स्थापना दिनानिमित्त


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहराच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील युवा कलाकार शिल्पकार बालाजी वल्लाल यांनी सुमारे 500 वर्षांपूर्वी अहमद निजाम शाह च्या काळात रुमीखान दख्खनी यांनी तयार केलेल्या मुलख मैदानी तोफेची प्रतिकृती तयार केली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी सर्व बाजूंचे फोटो लांबी-रुंदी -उंची हे सर्व स्वागत अहमदनगर परिवारातील ठाकूरदास परदेशी व ज्ञानसंपदा शाळेचे सीईओ विनीत साठे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. विनीत साठे व भूषण देशमुख तसेच क्वाईन संग्राहक पंकज मेहेर, आबीद खान यांच्या प्रयत्नातून अहमदनगर मधील ऐतिहासिक तोफेची प्रतिकृती तयार करण्याची संधी मला मिळाली, असल्याची भावना बालाजी वल्लाल यांनी व्यक्त केली.
तोफेचा इतिसाह सांगतांना बालाजी वल्लाल म्हणाले, अहमदनगर शहराची स्थापना अहमद निजाम शहा यांनी केली. त्याकाळी खास करुन रुमीखान दख्खनी नावाचा तोफा गाळणारा कारागीर तुर्कस्थानातून निजाम अहमद सुलतानने बोलावला होता. 1549 साली बुर्हान निजाम शहाच्या काळात जगातील सर्वात मोठी तब्बल 55 टन वजनाची 14 फूट 11 इंच लांब असलेली तोफ निजामशाही काळात अहमदनगर येथे इ.स. 1549 मध्ये तयार केलेली तोफ आहे. हिला मलिक मैदान तोफ किंवा मुलुख मैदान तोफ या नावाने ही ओळखली जाते ही तोफ अहमदनगरमध्येच मिश्र धातू (पोलाद) च्या सहाय्याने रुमीखान दख्खनीने तयार केलेली आहे. 1565 साली तालीकोटच्या लढाईत वापरण्यात आली होती. ती तोफ आजही बिजापूर, कर्नाटक येथे असून. ही तोफ ओतीव असून जगातील अद्भूत गोष्टी पैकी एक आहे. ही तोफ नेहमी, उन्हाळ्यात सुध्दा बर्फासारखी थंडगार असते. बालाजी वल्लाल यांनी यापुर्वी अहमदनगरमधील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती, भिस्तबाग महाल, चांदबीबी महाल, बागरोजा, माळीवाडा वेस, दिल्लीगेटवेस, अशा अनेक अहमदनगरमधील ऐतिहासिक वास्तू प्रतिकृती बनवलेले आहे. अहमदनगरमधील भुईकोट किल्लामध्ये ठेवलेल्या भुईकोट किल्ल्याचा प्रतिकृतीला तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे, श्री. महाजन, राहुल त्रिवेदी, राजेंद्र भोसले, पर्यटन मंत्री ना.रावल, लष्करामधील अधिकारी यांनीही भेट दिलेली आहे. तसेच हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, विश्व सुंदरी युक्ता मुखी, माजी नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक मनोज दुलम यांच्यासह नगरचे आमदार, खासदार अशा अनेक मान्यवरांनी या कलाकृतीला भेट देऊन प्रशंसा केली.

No comments:

Post a Comment