दीपस्तंभ पुरस्कारामुळे सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे सभासद आनंदीत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

दीपस्तंभ पुरस्कारामुळे सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे सभासद आनंदीत

 दीपस्तंभ पुरस्कारामुळे सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे सभासद आनंदीत

चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून केले अभिनंदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार 2020 नगरमधील सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेला प्राप्त झाला आहे. पतसंस्थेच्या 20 वर्षांच्या वाटचालीत प्रथमच राज्य स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे ही पतसंस्थेसाठी गौरवास्पद बाब आहे. पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवणारे सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संस्थेचे कामकाज सुरू असल्याचे या सन्मानामुळे अधोरेखित होते. या यशस्वी वाटचालीत संस्थेचे स्थापनेपासूनचे सर्व आजी माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, ठेवीदार, कर्जदार, खातेदार, सभासद यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे, अशी भावना सभासद विनोद हिरालाल भंडारी (वडाळावाला ) यांनी व्यक्त केली आहे.
पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांच्यावतीने चेअरमन ईश्वर बोरा, व्हाईस चेअरमन किरण शिंगी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभासद विनोद भंडारी, मनोज गुंदेचा, मार्केट यार्ड शाखेचे व्यवस्थापक मनोज लुणिया उपस्थित होते.
भंडारी म्हणाले की, 20 वर्षांपूर्वी सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी एका निश्चित ध्येयाने जैन ओसवाल पतसंस्थेची रूजवात केली. सुरूवातीपासूनच शिस्तबद्ध व दूरदृष्टीचा कारभार चालवत त्यांनी इतरांनाही प्रेरणा दिली. आर्थिक संस्थेत आदर्श व्यवस्थापन कसे असावे याचा वस्तुपाठ त्यांनी दाखवला. त्यामुळेच संस्थेनं सभासद, ठेवीदारांचा अतूट विश्वास प्राप्त केला. हा विश्वास कायम ठेवण्याचे काम भाऊंच्या उत्तराधिकार्यांनी निश्चितच केलं आहे. दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी संस्थेचा गौरव करताना राज्यात पतसंस्थांनी जैन ओसवाल पतसंस्थेचा आदर्श घ्यावा असे वक्तव्य केले. हा संस्थेचा मोठा बहुमान असून सभासद म्हणून अतिशय अभिमान वाटणारी गोष्ट आहे.
मनोज गुंदेचा म्हणाले की, संस्थेची गुंतवणूक 12 वेगवेगळ्या बँकेत केली आहे. एक दोन बँकांवर विसंबून न राहता अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याचे संस्थेचे काम सुरक्षितितेच्या दृष्टीने खरोखर आदर्शवत व अन्य संस्थांसाठी अनुकरणीय असेच आहे. व्यवसाय, व्यापाराला उत्तेजन देण्याचे, आर्थिक पत देण्याचं संस्थेचे धोरण विकास प्रक्रीयेला चालना देणारं आहे. व्यापारी वर्गाच्या सुविधेसाठी संस्थेची मार्केट यार्ड शाखा अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. जवळपास सर्वच बँकींग सुविधा अतिशय तत्परतेने मिळत असल्याने खातेदारांची चांगली सोय झाली आहे. संस्थेने 15 टक्के लाभांशाची परंपराही कायम पाळली आहे. उत्कृष्ट  कामकाजामुळे येत्या काळात संस्था 100 कोटींच्या ठेवीचा विक्रमी पल्ला निश्चित गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चेअरमन बोरा व व्हाईस चेअरमन शिंगी यांनी सदर पुरस्कार हा सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांच्या आदर्शांचा सन्मान असल्याचे तसेच सभासदांच्या विश्वासाचे प्रतिक असल्याचे म्हटलं.

No comments:

Post a Comment