जिल्हा मराठा संस्था चांगल्या लोकांमुळेच घडली : दरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

जिल्हा मराठा संस्था चांगल्या लोकांमुळेच घडली : दरे

 जिल्हा मराठा संस्था चांगल्या लोकांमुळेच घडली : दरे

नवभारत विद्यालयात प्राचार्य बी. के. सुर्वे यांचा सेवापुर्ती समारंभ\


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था केवळ चांगल्या लोकांमुळे घडली. संगमनेर सारख्या तालुक्यात चांगल्या संस्था असताना त्या तालुक्यातील एक सुपुत्र आपल्याला मिळाला हे आपले भाग्य असून सुर्वे सरांचे काम प्रशंसनीय असल्याचे गौरओदगार जिल्हा मराठा संस्थेचे सदस्य दीपक दरे यांनी काढले.
देहरे (ता. नगर ) येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या संस्थेच्या नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे  प्राचार्य  बी. के. सुर्वे हे प्रधिर्ग सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळ्या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक आर. के. बेनके यांनी केले.
याप्रसंगी प्राचार्य सुर्वे यांनी संस्थेतील आपल्या सेवेचा सुरुवातीपासूनचा लेखाजोखा मांडून कोणालाही संस्थेचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती संस्थेची असल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच संस्थेसाठी त्यांनी 25 हजार रुपयांचा चेक मदत म्हणून दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिलीप मगर, प्रा. गव्हाणे, प्रा. देवढे, प्रा. खोमणे, प्रा. काकडे, प्रा. गोरे, प्रा. गायकवाड, प्रा. वांढेकर, प्रा. कटारे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, आदी उपस्थित होते.
यावेळी शिरीष टेकाडे, ए. आर. बर्डे, ए. डी. कांडेकर, एस. एन. राशीनकर, ए. यू. लष्कर, ए. ए. लंगोटे, ए. ए. लोखंडे, पी. पी. मुळे, एस. एम. आघाव, ए. एस. निमसे, एस. एस. कटारे, व्ही. बी. सोनवणे, आर. एस. पवार, दादाराम हजारे, सचिन गोरे तसेच जुनिअरचे महेश म्हसे, अविनाश निमसे, कल्पना बोरसे, दीपाली काळे, अश्विनी खेतमाळीस, सागर ए. डी. यासह शिक्षकेतर कर्मचारी गोत्राळ, गाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एन. राशीनकर केले तर आभार ए. डी. कांडेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment