अहमदनगर महाविद्यालयाचे प्रोफेसर (डॉ.) एन. आर. सोमवंशी आता न्यू आर्ट्स कॉलेजच्या अ‍ॅकॅडमिक कौन्सिलवर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

अहमदनगर महाविद्यालयाचे प्रोफेसर (डॉ.) एन. आर. सोमवंशी आता न्यू आर्ट्स कॉलेजच्या अ‍ॅकॅडमिक कौन्सिलवर

 अहमदनगर महाविद्यालयाचे प्रोफेसर (डॉ.) एन. आर. सोमवंशी आता न्यू आर्ट्स कॉलेजच्या अ‍ॅकॅडमिक कौन्सिलवर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महाविद्यालय चे प्रोफेसर (डॉ.) एन आर सोमवंशी सर यांचे नुकतेच अहमदनगर जिल्हा मराठा समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या स्वायत्त महाविद्यालयाच्या विद्या परिषदेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर (डॉ.) नितीन  करमरकर यांच्या आदेश शहाणे पुढील तीन वर्षाकरिता ही नियुक्ती ग्राह्य असेल सन 2019 चा एकरूप परिणय क्रमांक 3 कलम 12 (4)(ड)अन्वये ही निवड होणे आवश्यक असल्याने प्रदीर्घ अनुभव संपन्न प्रोफेसर (डॉ.) एन आर सोमवंशी यांची या पदावर निवड करण्यात आली असे समजते.
प्रोफेसर (डॉ.) एन आर सोमवंशी हे सध्या पुणे विद्यापीठाचे अहमदनगर केंद्राचे संचालक पदावर कार्यरत असून अहमदनगर महाविद्यालयात ते झूलॉजी प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून व त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी विभागाचे समन्वयक म्हणून काम करत आहेत उपप्राचार्य अपिलीय अधिकारी व त्यांचे अनेक पदांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे
अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रजनीश बार्नबस यांच्या हस्ते आज सोमवंशी सरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सय्यद रजाक उपप्राचार्य प्रोफेसर बी एम गायकर डॉ. डी बी मोरे व उपप्राचार्य डॉ. ए वि नागवडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment