घरात मरण्यापेक्षा, पालिकेसमोर मरू! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 2, 2021

घरात मरण्यापेक्षा, पालिकेसमोर मरू!

 घरात मरण्यापेक्षा, पालिकेसमोर मरू!

50 हजाराच्या आतील बिले त्वरित द्या. अन्यथा

मनपा प्रशासनाकडून ठेकेदारांना केवळ आश्वासने. उपोषण करूनही मिळेना पैसे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना महामारीच्या संकटात दोन वर्षापासून हातात कोणतेही कामे नाही. त्यामुळे छोटे ठेकेदारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून देयके अदा करण्यात यावे. लॉकडॉउन वाढतच चालल्याने ठेकेदारांना कोणतेही काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शेतकर्‍याप्रमाणे आत्महत्या हा एकमेव पर्याय आमच्यापुढे आहे. घरात मरण्यापेक्षा महानगरपालिकेसमोर मरू, इतक्या टोकापर्यंत विचार करण्याची वेळ आली आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत मनपावर कामाचा व्याप नक्कीच खूप वाढलेला आहे याची आम्हाला जाणीव आहे, परंतु छोटे ठेकेदारांची देयके लवकरात लवकर अदा करावीत अशी मागणी ठेकेदार संघटनेच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर, सभापती, विरोधी पक्षनेते यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
आयुक्त नुसतेच आश्वासने देतात. त्याचे पालन होत नाही. छोट्या ठेकेदारांचे किरकोळ पैसे न दिल्याने उपासमारीची वेळ आली आहे. उपोषण करूनही पैसे मिळत नसल्याने ठेकेदार मधून संताप व्यक्त केला जात आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली ठेकेदारांचे 50 हजार आतील रक्कमेचे देयके देण्याची मागणी ठेकेदार संघटनेच्यावतीने करण्यात होती. या बाबीकडे कोणीही गांभीर्याने लक्ष न दिल्याने 25 जानेवारीला महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय गेटजवळ ठेकेदार संघटनेने उपोषण केले होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे महापालिकेचे प्रभारी आयुक्त पद असल्याने त्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडवावे असे सांगितले गेले. त्यानुसार 28 जानेवारीला मुख्य लेखा अधिकारी यांच्या उपस्थितीत ठेकेदारांनी उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर ठेकेदार महानगरपालिका आयुक्तांना भेटले. मार्च अखेर देयके अदा होतील असे आयुक्तांनी सांगत तसे आदेश ही संबंधित विभागाला दीले. परंतु अद्याप याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
ठेकेदार संघटनेचे अमृत नागून, शहानवाज शेख, अमृत वन्नम, मोसिन शेख, संजय डुकरे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here