माय लेकीचा एकत्र दशक्रिया विधी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 17, 2021

माय लेकीचा एकत्र दशक्रिया विधी.

 माय लेकीचा एकत्र दशक्रिया विधी.

कोरोनाच्या आघाताने शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
कोरोना... महामारीत अकोल्याच्या शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अकोले तालुक्यातील महिला पत्रकार सुकृताच्या आईचे आठ दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. आईचा दशक्रिया विधी पार पडण्याच्या 1 दिवस अगोदर सुकृताचंही कोरोनाामुळे निधन झालं. मायलेकीचा एकत्र दशक्रिया विधी करण्याचे दुर्भाग्य शिंदे कुटुंबीयांवर ओढावलं आहे.
सुकृता हिने पत्रकारितेमध्ये पदवी प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली.अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे पहाटे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय-लेकीचा पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न झाले आहेत. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.आईच्या जाण्यानंतर सुकृता अस्वस्थ होती. तिच्यावरही कोरोनाचे उपचार सुरु होते. मात्र आईच्या जाण्याचा तिच्यावर फार मोठा आघात झाला होता. ती पुरती हादरुन गेली होती. अखेर तिनेही आईपाठोपाठ प्राण सोडले. आता शिंदे कुटुंबावर मायलेकीवर एकत्रित दशक्रिया विधी करण्याची वेळ आली आहे.पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक जवळच्या लोकांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यातील एक म्हणजे सुकृता शिंदे. कोरोनाशी झुंज देत असतांनाच ती हे जग सोडून गेली. मायलेकींच्या अकाली जाण्याने शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. शिंदे कुटुंबावर मोठा आघात झालाय.

No comments:

Post a Comment