निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच घेऊ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच घेऊ!

 निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच घेऊ!

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे व्यापार्‍यांना आश्वासन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांनी नियोजन करणे गरजेचे आहे तसेच बाजारपेठा खुल्या केल्या नंतर शासनाच्या नियमाचे पालन होणे गरजेचे आहे. मास्क वापरणे,सोशल डिस्टंसिंग, नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. कालपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्याही कमी होत आहे,आता दररोज 20हजार नागरिकांची कोविड तपासणी केली जाते. प्रशासनालाही वाटते की, बाजारपेठा व व्यापार सुरळीत रहावा परंतु कोरोनाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. किराणा,भुसार व किरकोळ बाजाराचे निर्बंध कसे शिथील करता येईल याचा निर्णय लवकरच घेऊ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी  दिली आहे.
आडते बाजार,दाळ मंडई,मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या वतीने बाजारपेठा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व आयुक्त शंकर गोरे यांच्या कडे मागणी केली. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने सायंकाळी पाहणी करून मार्केट यार्ड येथील मर्चंट बँक येथे व्यापार्‍यांची बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना व्यापार्‍यांना दिल्या व व्यापार्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्याकडे बाजारपेठेतील वाहतुकीचा व कोरोना नियमाचा आराखडा दिला.व शासकीय नियमांचे पालन करण्याची हमी पत्र ही दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले हे व्यापार्‍यांशी चर्चा करताना म्हणाले की,रुग्णसंख्या कमी होणे गरजेचे आहे. कोरोना विषाणू शहराकडून ग्रामीण भागाकडे वाढत गेला आहे.पहिला लाटेमध्ये कोरोनाचे 75 हजार कोरोनारुग्ण सापडले होते. याच बरोबर दुसर्‍याला लाटेतही कोरोनाचे उच्चांक गाठला आहे. या लाटेमध्ये 1 लाख 75 हजार रुग्ण सापडले यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा,बेडचा तुटवडा जाणवला, मृत्यूची संख्याही वाढली.जुलै महिन्यामध्ये तज्ञांच्या मते तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
व्यापार यांच्यावतीने बँकेचे चेअरमन अनिल पोखरणा,संतोष बोरा संजय चोपडा,कमलेश भंडारी, नगरसेवक विपुल शेटीया यांनी प्रशासनाला आश्वासन दिले की,सर्व व्यापारी कोरोना विषाणू संदर्भातील सर्व नियमांचे पालन करू, व्यापार्‍यांनी दिलेल्या आराखड्यानुसार व्यवसाय केला जाईल, वाहतूक ठप्प होणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाणार आहे.याच बरोबर दुकानांमध्ये एका ग्राहकालाच प्रवेश दिला जाईल,मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. यावेळी व्यापार्‍यांच्या वतीने कापड बाजार,सराफ बाजार सुरू करण्याची मागणी केली.पुणे-औरंगाबाद-नाशिक येथील बाजारपेठा सुरू झाल्यामुळे नगर मधील ग्राहक दुसर्‍या शहरातील बाजारपेठा कडे वळू लागले आहेत त्यामुळे नगरची बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याची भीती व्यापार्‍यांमध्ये निर्माण झाली आहे असे यावेळी सांगितले.
या आराखड्याचा विचार करून अटी व शर्तीनुसार बाजारपेठ उघडण्याचा निर्णय घेऊन असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यापार्‍यांना दिले.यावेळी मर्चंट बँक चेअरमन अनिल पोखरणा,संचलक संजय चोपडा,संचालक कमलेश भंडारी,नगरसेवक विपुल शेटीया,संतोष बोरा,राजेंद्र बोथरा,संजय लोढा,नितीन भंडारी आदींसह अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,आयुक्त शंकर गोरे,जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर,उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे आदींसह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment