तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे- डॉ. बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 23, 2021

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे- डॉ. बोरुडे

 तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे- डॉ. बोरुडे

नागापूर आरोग्य केंद्रास डॉ.सतीश राजूरकर यांची भेट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे नगर शहरातील आरोग्य केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे.त्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण होतो,यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे.याच पार्श्वभूमीवर नागापूर येथील आरोग्य केंद्रावर मनपा आरोग्य समिती व आरोग्य अधिकारी डॉ.सतिष राजूरकर यांनी पाहणी करून नियोजन करण्याच्या सूचना आरोग्य केंद्रावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या.
नगरसेवक डॉ. सागर बोरुडे म्हणले की, लसीकरण केंद्रावर होणार्‍या गर्दीमुळे कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.यासाठी महापालिकेच्या वतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे याच पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणण्यासाठी नियोजन केले जाईल, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला परतवून लावण्यासाठी सर्व नगरकरांच्या सहकार्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने मास्क, सॅनिटीजर, सोशल डिस्टंसिंग आधी सर्व नियमांचे पालन करावे असे आव्हान नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले.
यावेळी बोलताना मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर म्हणाले की, आपल्या शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या कमी झाली असली तरी तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. ही लाट परतवून लावण्यासाठी नागरिकांच्या सहकार्यची खरी गरज आहे यासाठी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग आधी सर्व नियमांचे पालन करावे.आज पासून मनपाच्या 8 आरोग्य केंद्रावर अठरा वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरनाला सुरुवात झाली असून लसीकरणा साठी गर्दी वाढली आहे यासाठी लसीकणाचे नियोजन केले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे शासनच्या आदेशाचे पालन करावे विनाकारण गर्दी करू नये नागरकरांनी कोरोना विषाणूचे लक्षणे आढळल्यास महापालिकेतील आठही आरोग्य केंद्रांवर मोफत तपासणी करून मिळणार आहे. खाजगी हॉस्पिटल चालकानीही कोरोनाचे लक्षण असणार्‍यांना नागरिकांना तपासणीसाठी महापालिका आरोग्य केंद्रावर पाठवावे जेणे करून त्यांची आर्थिक बचत होईल,गोरगरीब नागरिकांना तपासणीचा लाभ घेता येईल असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here