हवामान बदलाचं संकट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

हवामान बदलाचं संकट

 हवामान बदलाचं संकट


ज जगासमोर हवामान बदलाचं संकट उभं आहे. दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होतेय, प्रदुषणाची समस्या वाढतेय. अनेक ठिकाणची जंगले विकासाच्या नावाखाली उध्वस्त केली जातात. केवळ आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाच्या स्त्रोतांचा अमाफ वापर केला जातोय, त्याचा र्‍हास मोठ्या प्रमाणावर केला जातोय.पृथ्वीवर आणि समुद्रातही प्लॅस्टिकचे साम्राज्य वाढलंय. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यामागे या पृथ्वीची काळजी आणि तिला वाचवण्याची तळमळ आहे.

आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतोय. हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम आहे. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातोय.
औद्योगिक क्रांतीनंतर वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढू लागले. कार्बनचे अगदी अल्प प्रमाणही वाढलं तर त्याचा मोठा परिणाम पृथ्वीवरील सर्व सजिवांवर होतोय. त्यामुळे यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या वतीनं प्रयत्न सुरु झाले. त्याचाच परिणाम म्हणजे 1972 साली स्टॉकहोम येथे जागतिक वसुंधरा परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत जगभरातील 119 देश सामिल झाले होते. भारतानेही या परिषदेत भाग घेतला आणि मोठं योगदान दिलं. या परिषदेत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे पर्यावरणावर काम करणार्‍या यूएनईपी म्हणजे युनायटेड नेशन्स एनव्हायरमेन्ट प्रोग्राम या संस्थेची स्थापना आणि दुसरं म्हणजे दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करायचा. दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम तयार करण्यात येते. या वर्षी ’ठशळारसळपश, ठशलीशरींश, ठशीीेींश’ ही थीम आहे. त्या माध्यमातून पर्यावरणातील लहान लहान गोष्टींचे संवर्धन करणे, त्याचा शाश्वत पद्धतीने वापर करणे हा संदेश देण्यात येत आहे. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या संघटनांनी हे दशक ’ऊशलरवश ेष ठशीीेींळपस एलेीूीींशाी’ म्हणजेच परिसंस्था पुनर्संचयनाचं दशक म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलाय. जागतिक तापमान वाढ जर 2 अंश सेल्सियसपेक्षा कमी ठेवायचं असेल आणि वाढत्या लोकसंख्येची अन्नसुरक्षा साधायची असेल तर या परिसंस्थांचं पुनुरुज्जीवन करणं अत्यंत आवश्यक असल्याचं यूएनने आपल्या एका अहवालात सांगितलं आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीवर सजीवांच्या अनेक प्रजाती संकटात सापडल्या आहेत. असंच सुरू राहिलं, तर जीवसृष्टी नामशेष होईल, अशी भीतीही बोलून दाखवली जाते. पण ही भीती खरी ठरली तर? जगातल्या महत्त्वाच्या वनस्पती, विशेषतः अन्न देणारी पिकं नष्ट झाली तर? अशा परिस्थितीत बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी  ग्लोबल सीड व्हॉल्टची निर्मिती करण्यात आली आहे. हा व्हॉल्ट म्हणजे एक प्रकारचा डीप फ्रीझरच आहे म्हणा ना. नॉर्वेच्या स्वालबार्ड द्वीपसमुहातील एका बेटावरच्या डोंगरातलं भुयार आहे. तिथे जगातली सगळ्यात मोठी बियाण्याची बँक तयार करण्यात आली आहे. 2008 सालापासून आतापर्यंत या व्हॉल्टमध्ये पिकं आणि जंगलातील वनस्पती मिळून दहा लाखांहून अधिक प्रजातींच्या बियांचे नमुने साठवून ठेवण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणीय संकट किंवा इतर कुठल्या कारणानं एखाद्या प्रदेशातील वनस्पती नष्ट झाल्या, तर या व्हॉल्टमध्ये साठवून ठेवलेल्या बियाण्याचा वापर करून ती प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवली जाणार आहे.
जैवविविधता आणि प्रजातीच्या संरक्षणाची जबाबदारी -  पृथ्वीवरची पिकांमधली जैवविविधता कायम राखण्यासाठी असे व्हॉल्ट मदत करतील असं काही संशोधकांना वाटतं. पण ही जैवविविधता का महत्त्वाची आहे? तर जैवविविधतेमुळेच पृथ्वीवर जगण्यासारखी परिस्थिती टिकून आहे. एखाद्या परिसंस्थेतला एखादा घटक नष्ट झाला, तर तिथला सगळा समतोल बिघडतो. माणसाच्या अन्नसुरक्षेसाठीही जैवविधता जपणं. विशेषतः पिकांमधली जनुकीय विविधता टिकवणं गरजेचं आहे. जनुकीय विविधतेमुळे प्रजाती पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेतात आणि टिकून राहू शकतात. पण हवामानबदल आणि त्यातून निर्माण झालेल्या पर्यावरणीय संकटांमुळे ही जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एखादं पिक अचानक नष्ट होऊ नये, यासाठी ही सीड व्हॉल्टची कल्पना पुढे आली आहे.
जगभरात इतर अनेक बियाणं बँका आहेत, ज्या स्थानिक पातळीवर बियांचं जतन आणि संवर्धन करतात. सरकार तसंच वेगवेगळ्या संस्थांमार्फत त्या चालवल्या जातात. पण समजा काही कारणानं एखाद्या देशातली सीड बँक नष्ट झाली तर? अशा वेळेस ग्लोबल सीड व्हॉल्टमधून बियाणं बाहेर काढता येईल. घरातले पैसे संपले, की आपण बाहेर बँकेत साठवलेले पैसे काढून वापरतो, तसंच आहे हे. भारतातही अशा सीड बँक आहेत. बीबीसीच्या 100 थेाशप मध्ये समावेश झालेल्या राहीबाई पोपेरे यांची देशी वाणांची बँक त्यापैकीच एक आहे. इतकंच नाही तर भारतानं स्वतःचा सीड व्हॉल्टही तयार केला आहे. लडाखच्या चांगला मध्ये हा व्हॉल्ट आहे. आता तर काही संशोधक चंद्रावर अशा व्हॉल्टच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडत आहेत. पण असा व्हॉल्ट बांधण्याची किंवा नॉर्वेमधला सीड व्हॉल्ट पुन्हा पुन्हा उघडण्याची गरजच पडणार नाही, यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत असंही काही पर्यावरणतज्ज्ञांना वाटतं. त्यासाठी पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवं.

No comments:

Post a Comment