सभागृह नेते बारस्करांकडून नाले सफाई कामाची पाहणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 3, 2021

सभागृह नेते बारस्करांकडून नाले सफाई कामाची पाहणी.

 सभागृह नेते बारस्करांकडून नाले सफाई कामाची पाहणी.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पावसाळयाचे दिवस सुरू झाले असून हवामान तज्ञांनी सांगितले की, यावर्षी मोठया प्रमाणात पाऊस पडणार आहे. मनपाच्या वतीने दरवर्षी ओढे, नाले ,गटारी व सिनानदी साफसफाईचे काम हाती घेतले जाते. यावर्षी हे काम संथ गतीने  सुरू  आहे. पावसाळा सुरू झाला असतानाही साफ सफाईचे काम पूर्ण झाले नाही. पहिल्याच दोन पावसात रस्त्यावरून धो धो पाणी वाहतानाचे निदर्शनास आले. मनपा प्रशासनाने याकामाकडे लक्ष केंद्रीत करून लवकरात लवकर नाले सफाईचे काम पूर्ण करावे. पावसाळयामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.  साथीचे आजार मोठया प्रमाणात पसरत असतात. यामध्येच कोरोना विषाणूचे सावटही आपल्यावर आहे. सिना नदीमधील अतिक्रमणे व टाकण्यात येणार्‍या मातीच्या ढिगार्‍यामुळे पावसाचे पाणी थोपून नागरिकांच्या घरामध्ये व दुकानामध्ये जाते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात होते.
कल्याण महामार्गावरील सीनानदीचा पुल पाण्याखाली जात असल्यामुळे या महामार्गावरील वाहतुक ब-याच वेळ ठप्प राहते. तसेच कल्याण रोड परिसरातील शिवाजी नगर,समता नगर, आदर्श नगर या परिसरातील नागरिकांचा पावसाच्या पुरामुळे संपर्क तुटला जातो. व दातरंगे मळा, बागरोजा हडको, या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी जावून घर संसारोपयोगी साहित्याचे नुकसान होते. दैनंदिन जिवनामध्ये बाधा पोहचते.
मनपा सभागृह मा.श्री.रविंद्र बारस्कर यांनी शहरातील नाले सफाईची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रशासनास विविध उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या. या प्रसंगी मा. नगरसेवक मा.श्री.विलासराव ताठे भाजपाचे मंडल उपाध्यक्ष मा.श्री.मंगेश निसळ व मनपा कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here