नवचेतना योग प्राणायाम शिबिर शिक्षकांसाठी नवसंजीवनी ः टेमकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

नवचेतना योग प्राणायाम शिबिर शिक्षकांसाठी नवसंजीवनी ः टेमकर

 नवचेतना योग प्राणायाम शिबिर शिक्षकांसाठी नवसंजीवनी ः टेमकर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतातील शिक्षकांच्या आरोग्यासाठी परदेशातून रचनाताई फासाटे यांनी मोफत ऑनलाईन योग प्राणायामचे उत्कृष्टपणे धडे दिले आहेत.
कोरोनाचा हा काळ म्हणजे आपल्या सर्वांची शारीरिक आणि मानसिक परीक्षा पाहणारा आहे. अशा वातावरणात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आणि निःशंक महाराष्ट्र परिवाराने आयोजित केलेले नवचेतना योग प्राणायाम शिबिर शिक्षकांसाठी नवसंजीवनी ठरेल यात शंका नाही..!! असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणेचे संचालक दिनकर टेमकर यांनी केले.
ते अँक्टिव्ह टीचर इंडिया अर्थात ढख, अँक्टिव्ह टीचर महाराष्ट्र अर्थात ढख, निशंक महाराष्ट्र आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील व भारत देशातील शिक्षकांसाठी  आयोजित दिनांक 21 मे 2021 ते 25  मे 2021 या कालावधीत  मोफत पाच दिवसीय ऑनलाइन नवचेतना योग प्राणायाम शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
कोरोनाच्या तणावपूर्ण वातावरणात, शिक्षक फ्रंटलाईन वॉरीयर म्हणून काम करत आहेत. हे काम करत असतांना अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली ,काहींना अघटित संकटांना सामोरे देखील जावे लागले. यात शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशातील  मिनिस्ट्री ऑफ  आयुष योग शिक्षिका  मूळच्या भारतीय आणि अहमदनगरची लेक श्रीमती रचना सदाफुले/ फासाटे यांनी योग प्राणायामचे झूम अँपच्या मदतीने ऑनलाइन   प्रात्यक्षिकासह भारतातील सुमारे दोन हजार  शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबांना योग प्राणायामचे , सकारात्मक विचारांचे व मानसिक शांततेचे अतिशय उत्कृष्ट धडे दिले.
स्वस्थ जीवन जगणं,समाधान हे जीवनाचे भांडवल आहे, रोज प्राणायाम करणं, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. हा अनमोल मंत्र रचनाताईंनी सर्वांना या शिबिरात दिला.
या शिबिरात रचना ताईंनी सोप्या शब्दात प्रात्यक्षिकासह सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, आसने इ. कृती सहज, सुलभ, सोप्या पद्धतीने व वेगळ्या ट्रिक्स देऊन सर्व शिक्षकांकडून करवून घेतल्या. शांत चित्ताने व सावकाश प्राणायाम केल्याने कसा जास्त परिणाम, फायदा होतो ते त्यांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिले. ऑक्सिजनची पातळी वाढवणे , फुप्फुसांची क्षमता वाढवणे, वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट आपल्याला हवी असते ती द्यायला योग- प्राणायाम समर्थ आहे.  प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. आपले मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो याचे धडेच या पाच दिवसात शिक्षकांना मिळाले.
या योग प्राणायाम शिबिरात विचारांची नवंसंजीवनी देण्यासाठी स्पिरिच्युअल टॉक्स, प्रेरणादायी विचार देण्यासाठी लाभलेले हितेश पनेरी सर (उउठढ राजस्थान), पवन सुधीर मॅडम डॉ.पवन सुधीर (कजऊ आर्ट डिपार्टमेंट छउएठढ नवी दिल्ली), डॉ.प्राची साठे (माजी विशेष कार्यकारी अधिकारी शालेय शिक्षण मंत्रालय मुंबई ) , दिनकर टेमकर साहेब ( शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य) यांनी सकारात्मक विचारांची पेरणी केली. या विचारांमुळेदेखील नवचेतना निर्माण झाली. याबरोबरच शिबिरात मोरोक्को देशातील मान्यवरांनी देखील मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
रचनाताई  आम्ही सर्वजण आपले ऋण व्यक्त करतो आणि ग्वाही देतो की आम्ही स्वतः साठी वेळ देणार,  आपला बहुमुल्य वेळ परदेशातून तुम्ही  आम्हा सर्वांसाठी दिला ही खरी देशसेवा आहे. परदेशात राहून देखील मातृभूमीशी आपली नाळ घट्ट जोडलेली आहे हे यावरून दिसते....!! असे आभार व्यक्त करतांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ ज्योती दीपक बेलवले या म्हणाल्या.
कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला जशी  सर्व सदस्यांच्या आरोग्याची काळजी असते, तद्वत काळजीवाहू कुटुंब प्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक  ए .टी.एम.चे राज्य संयोजक विक्रम अडसूळ यांनी शिबीर आयोजनात महत्वाची भूमिका बजावली.   ए.टी.एम. परिवारातील उपक्रमशील शिक्षक  ज्योती बेलवले ,तुकाराम अडसूळ , नारायण मंगलारम , ज्ञानदेव नवसरे , उमेश कोटलवार,नदीम खान तंत्रसहाय्य करणारे गजेंद्र बोंबले, नितीन अंतरकर व ए. टी .एम .चे सर्व जिल्हा संयोजक यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. कोविड च्या  काळात  योग शिबिर हे र्लेींळव र्ींरललळपश पेक्षाही बूस्टर डोस होतं.अगदी संपूर्ण मन आणि शरीर प्रफुल्लित झालं.
योग  प्राणायामाचे नवचेतना शिबिर म्हणजे कोरोना काळातील प्रत्येकाच्या आयुष्यात आलेली नवी पहाटच होय.

No comments:

Post a Comment