जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान 10 मोहीम सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 3, 2021

जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान 10 मोहीम सुरू

 जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान 10 मोहीम सुरू

अहमदनगर ः हरवलेले किंवा पळविलेल्या मुला- मुलींचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात 1 ते 30 जून दरम्यान ऑपरेशन मुस्कान- 10 ही शोध मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी दिली.जून महिन्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान ही शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत रेकॉडवरील हरवलेले, पळविलेल्या अल्पवयीन मुला- मुलींसह रेल्वे, बस स्थानके, रस्त्यावर भिक मागणारे, कचरा गोळा करणारे, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणार्या मुला- मुलींचा शोध घेतला जाणार आहे. मिसिंग झालेल्या महिलांचाही या मोहिमेत शोध घेतला जाणार आहे. ऑपरेश मुस्कान मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात एक पथक नियुक्त केले आहे.  ऑपरेश मुस्कान यशस्वी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रांजली सोनवणे, जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक, अशासकीय संस्था, बालगृह, बालकल्याण समिती, जिल्हा बाल सुरक्षा कक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या मोहिमेवर नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक मसूद खान यांच्यासह पोलीस कर्मचारी एस. बी कांबळे, ए. आर. काळे, ए. के. पवार, एम. के. घुटे, सी. टी. रांधवन, आर. एम. लोहाळे, एस. एस. काळे यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment