कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृकता आली - संजय सपकाळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृकता आली - संजय सपकाळ

 कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृकता आली - संजय सपकाळ

भिंगार येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर जॉगींग पार्कच्या हिरवळीवर नागरिकांनी एकत्र येत योग, प्राणायाम केले. यामध्ये रमा फाऊंडेशन व मानस प्रतिष्ठानचे सदस्य देखील सहभागी झाले होते. आरोग्याप्रती जागृक राहून दररोज व्यायाम व योग करण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमा फाऊंडेशनचे दिपक अमृत, राहुल अमृत, मानस प्रतिष्ठानचे विशाल बेलपवार, मंगेश मोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. योगप्रशिक्षक प्रकाश देवळालीकर व विक्रम चव्हाण यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह सादर केले. उपस्थित नागरिकांनी विविध आसने करुन वर्षभर व्यायाम व योग करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर सकाळी व्यायाम व योग केला जातो. त्याचबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. योग दिन एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता ग्रुपच्या वतीने वर्षभर निरोगी आरोग्यासाठी महत्त्व देण्यात येत आहे. कोरोनामुळे जॉगिंग पार्क बंद झाले होते. तरी सर्व सदस्यांनी दररोज घरी नित्यनियमाने योग, प्राणायाम सुरु ठेवले होते. कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृकता आली असून, प्रत्येकाने सदृढ आरोग्यासाठी योग करणे काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, अशोक लोंढे, मेजर दिलीप ठोकळ, दिलीप गुगळे, सुधाकर चिदंबर, दिलीप बोंदर्डे, सुहास ढुमणे, सिताराम परदेशी, अजय खंडागळे, विकास निमसे, सुमेश केदारे, पोपट नगरे, विकास भिंगारदिवे, सुनिता वराडे, विद्या जोशी, प्रांजली सपकाळ, अनिता सोनवणे, आरती बोर्हाडे, लक्ष्मी गायकवाड, सुरेखा आमले, किरण फुलारी, राजू कांबळे, सुर्यकांत कटोरे, भारत दहिफळे, नामदेव जावळे, मनोहर पाडळे, भास्कर भालेराव, आब्बास शेख, विनोद खोत, देवीदास गंडाळ, प्रफुल्ल मुळे, धनंजय नामदे, रमेश त्रिमुखे, राहुल थोरात, संदिप सोनवणे, राजू शेख, संतोष हजारे, दिपक टाक, सत्यजीत कस्तुरे, आसाराम बनसोडे, सरदारसिंग परदेशी, विजय सोमवंशी, रमेश कोठारी, हेमंत गोयल, संकेत शेलुकर आदी आदिंसह ग्रुपचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment