कचरा प्रक्रियेसाठी मान्सून शेडची गरज. - अविनाश घुले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

कचरा प्रक्रियेसाठी मान्सून शेडची गरज. - अविनाश घुले.

 कचरा प्रक्रियेसाठी मान्सून शेडची गरज. - अविनाश घुले.

स्थायी समितीच्यावतीने कचरा विभागाची बैठक संपन्न.
बुरुडगाव कचरा डेपोत मोठी दुर्गंधी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी बुरुडगाव येथे कचरा डेपोची निर्मिती केली. या ठिकाणी कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. कचरा प्रक्रियेसाठी मोठमोठ्या यंत्रसामग्री बसविण्यात आल्या, परंतु या मशीन चालवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्यामुळे विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तसेच या ठिकाणी मान्सून शेड नसल्यामुळे शहरातील संकलित केलेला कचरा भिजला जात असल्याने या कचर्‍यावर प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. याची दखल घेऊन मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी बुरुडगाव येथील मनपाच्या कचरा डेपोला अचानकपणे भेट दिली. याठिकाणचे विविध प्रश्न निदर्शनास आल्यानंतर घनकचरा विभागाची तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मान्सून शेडची गरज आहे. व लिचेट वॉटरची गटार तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ शकते. यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच ओला व सुका कचरा विलगीकरण करण्यासाठी उपाय योजना कराव्यात. याचं बरोबर नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे.तेव्हाच ओला व सुका कचरा वेगळा होईल. कचर्‍याच्या मोजमापासाठी सक्षम अधिकार्‍याची नेमणूक करावी याचं बरोबर घंटागाड्या कचरा संकलनासाठी संपूर्ण शहरभर रहदारी मध्ये फिरत असता एखादी दुर्घटना किंवा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? कारण घंटा गाड्यांचा इन्शुरन्स उतरविला नसल्याचे सभापती घुले यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ताबडतोब इन्शुरन्स उतरवण्याच्या सूचना दिल्या. लवकरच महापालिकेचा वजन काटा बसविण्यात येणार असून 30 जून रोजी मनपाचा स्वतंत्र वजन काटा कार्यवीत होणार आहे.यावेळी उपायुक्त यशवंत डांगे,मा.नगरसेवक सचिन जाधव,ड. धनंजय जाधव,बाळासाहेब पवार,निखिल वारे, घनकचरा विभागाचे प्रमुख शंकर शेडाळे,के.के.देशमुख,पी.एस.बिडकर व स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते

  मनपाच्या स्वमालकीचे नऊ ट्रॅक्टर उभे असून ते ट्रॅक्टर ठेकेदाराला भाड्याने का दिले नाही? त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे, कचर्‍या संदर्भातील दैनंदिन अहवाल सादर करण्यात यावा तसेच शहरात सुरू असलेल्या नालेसफाईची माहिती देण्यात यावी. शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईतील गाळ रस्त्यावर पडला आह.े तो उचलला जात नाही ,तरी लवकरात लवकर हा गाळ उचलण्यात यावा तसेच मटन,चिकन दुकानदार वेस्टेज रस्त्यावर फेकून देतात त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आद सह सर्व प्रश्न प्रशासनाला स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी निदर्शनास आणून दिले व यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here