कामगारांच्या थकीत पगारासाठी, जिल्हा कामगार संघटनेचे उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

कामगारांच्या थकीत पगारासाठी, जिल्हा कामगार संघटनेचे उपोषण

 कामगारांच्या थकीत पगारासाठी, जिल्हा कामगार संघटनेचे उपोषण

एमआयडिसी मधील क्लासिक व्हील युनिट 2 मधील कामगारांची उपासमार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात मध्ये शासनाने कामगारांवर कामावरून कमी करू नये व कामगारांचे पगार देण्याच्या सूचना केल्या होत्या,परंतु अहमदनगर एमआयडीसीमधील क्लासिक व्हील युनिट 2 मधील 25 कामगारांना लॉकडाऊन मधे कामावरून कमी केले व वेतनही देण्यात आले नाही, शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून पगार न देता कामावरून काढून टाकले. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना त्याच्या हक्काचे पैसे द्यावे व त्वरित कामावर हजर करून घ्यावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा कामगार कार्यालय येथे बेमुदत अमर उपोषण अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले. अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेने वेळोवेळी कंपनी प्रशासक व कामगार आयुक्तांकडे पाठपुरवठा केला होता,परंतु कंपनीने कामगार कायद्याची पायमल्ली करत कामगारांवर अन्याय केला जात आहे. कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले तरी कामगारांना त्वरित कंपनीमध्ये कामावर हजर करून घ्या, कामगार आयुक्त कार्यालयात एकाही मिटींगला उपस्थित न राहता कामगार कायद्याला केराची टोपली दाखवली आहे. तसेच कंपनी कडून वेळोवेळी कामगारांची दिशाभूल करण्यात आली.
क्लासिक व्हील युनिट 2 मधील कामगारांना थकित वेतन आदा करण्यासाठी जिल्हा कामगार कार्यालय समोर अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे वतीने आमरण उपोषण करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष  संतोष लांडे,दत्ता तापकिरे,किरण दाभाडे,पै.सुनील कदम,किशोर पालवे,भानुदास डोळस,विश्वास पंडित, शेखर भिंगारे,सुदर्शन प्रधान,स्वप्नील साळवे,राजेंद्र दरंदले,शैलेश कांडेकर आदी सह कामगार यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here