भंगार मालाचा ट्रक पळवून ड्रायव्हरचे अपहरण करणारी टोळी गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

भंगार मालाचा ट्रक पळवून ड्रायव्हरचे अपहरण करणारी टोळी गजाआड.

 भंगार मालाचा ट्रक पळवून ड्रायव्हरचे अपहरण करणारी टोळी गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शनिशिंगणापूर फाट्यावरून पितळ, तांबे, अ‍ॅल्युमिनियम स्टीलचे सुमारे 5 लाखांचे भंगार असलेली ट्रक अहमदनगर ला घेवून येत असताना पोलिस असल्याची बतावणी करून श्रीधर सोनवणे या ट्रक ड्रायव्हरचे अपहरण करुन लुटणार्‍या टोळीचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पथकाने या टोळीतील तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना मोक्का लागला असल्याचे समजते दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी की, 27 मे 2019 रोजी श्रीधर जंगलु सोनवणे वय 34 वर्षे, धंदा ड्रायव्हर रा.लजपतराय वाडी, एकलहरे ता. श्रीरामपूर जि-अहमदनगर हे त्याचे ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचे गाडी नं. एम एच-42-एम-9482 मध्ये 4,91,328/ रु किमतीचे भंगार त्यात पितळ, तांबे, अल्युमिनियम व स्टील असे नगर येथे घेऊन जात असताना शनिशिंगणापूर फाट्याजवळ त्यांना एक पांढर्‍या ईरटीका गाडी मधून चार इसम येवून त्यांनी आडवून आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करून शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली व बळजबरीने त्यांच्याकडील ईटीका गाडीतबसवून त्यांचे अपहरण करून त्यांना पुढे वरवंडी गावचे शिवरात आडराणान नेवून सोडून दिले व ट्रक भिंगार सह घेऊन गेले आहेत त्याबाबत राहुरी पो.स्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि अनिल कटके यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, मनोज गोसावी, सुरेश माळी, विशाल दळवी, दीपक शिंदे, शंकर चौधरी, सागर ससाने, अशोक काळे, जालिंदर माने, उमाकांत गावडे यांचे एक स्वतंत्र पथक स्थापन केले पथक गुन्हा दाखल झाले पासून आरोपींच्या शोधात असताना माहिती मिळाली की हा गुन्हा सराईत गुन्हेगार तसेच मोक्याचे गुन्ह्यात जामिनावर मुक्त असलेला तोफिक सत्तर शेख श्रीरामपूर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला. असल्याची बातमी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सांगितली. त्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने श्रीरामपूर येथे जावुन तोफिक सत्तर शेख वर्षे वय 35 वर्ष रा. कांजीबाबा रोड ,वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन कोण याबाबत सखोल विचारपूस करता त्याने गुन्हा त्याचे साथीदार साजित खालील मलिक उर्फ मूनचुन रा. पापाजलाल रोड वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर, जावेद मुक्तार कुरेशी बजरंग चौक श्रीरामपूर, युसूफ उर्फ सोनू आजम शेख रा. लक्ष्मी नगर कोपरगाव, शोएब फकीरा कुरेशी उर्फ वैजापूरवाले श्रीरामपूर यांचेसह मिळून केला. असल्याची कबुली दिल्याने आरोपी साजिद खालीद मलीक उर्फ मूनचुन वय 24 वर्ष रा. पापा जलाल रोड वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि अहमदनगर, जावेद मुक्तार कुरेशी वय 24 वर्ष बजरंग चौक श्रीरामपूर ता श्रीरामपूर जि अहमदनगर, हे मिळून आल्याने त्यांना श्रीरामपुर मधील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहेत. आरोपी युसूफ उर्फ सोनू आजम शेख लक्ष्मी नगर कोपरगाव फरार, व शोएब फकीरा कुरेशी उर्फ वैजापूरवाले श्रीरामपूर फरार यांचा त्यांचे राहते घरी जावून शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे गुन्ह्यातील चोरीस केलेल्या मुद्दे माला बाबत विचारपूस करता त्यांनी मुद्देमाल हा रामगड श्रीरामपूर येथील आयशा ट्रेडर्स नावाचे भंगारवाला अरबाज जाकीर मंसूरी उर्फ पिंजारी यास विकलेला आहे असे सांगितले वरून पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी जावून आरोपी अरबाज जाकिर मंसुरी उर्फ पिंजारी वय 19 वर्षे कुरेशी मोहल्ला सुभेदार वस्ती जवळ श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर यास ताब्यात घेवून गुन्हातील चोरीस गेले माला पैकी 5920 रु किमतीचे 148 किलो स्टील भंगार हे काढून दिल्याने ते दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहे.
आरोपी यांना गुन्हा करताना त्यांनी आणखी कोणी साथीदार आहे काय असे विचारपूस केली असता त्यांनी सदर फिर्यादी यांची गाडी भरून निघाले ची माहिती ही बेलापूर येथील आमचा साथीदार शाम साळुंखे यांनी दिल्याचे सांगितल्याने आरोपी नामे शाम भाऊराव साळुंखे व 20 खटकळी बेलापूर ता श्रीरामपूर जि अहमदनगर यास ताब्यात घेतलेले आहे
आरोपी तोफिक सत्तर शेख वय 35 वर्षे काजीबाबा रोड ता श्रीरामपूर जि अहमदनगर, साजिद खालीद मलिक उर्फ मूनचुन वय 24 वर्षे रा पापाजलाल रोड वॉर्ड नंबर 2 ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर हे मोक्कातील गुन्ह्यात सध्या जामिनावर मुक्त आहेत. आरोपी तोफिक सत्तार शेख याच्यावर लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
आरोपी तोफिक सत्तर शेख वय 35 वर्ष काजीबाबा रोड ता श्रीरामपूर जि अहमदनगर, साजिद खालीद मलिक उर्फ मूनचुन वय 24, जावेद मुक्तार कुरेशी वय 24, शाम भाऊराव साळुंखे वय 20, सर्वजण रा., अरबाज झाकीर मंसूरी उर्फ पिंजारी वय 19 वर्षे श्रीरामपूर जि.अहमदनगर यांना मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील कारवाई राहुरी पो.स्टे करीत आहे.
ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, दिपाली काळे मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, संदीप मिटके उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here