पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज : घिगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 14, 2021

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज : घिगे

 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज : घिगे

साकतखुर्द प्राथमिक शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही काळाची गरज आहे. हयात असताना माणूस जे काम करतो त्याची आठवण तो गेल्यावरही ताजी रहाते. वृक्ष संगोपणाने स्मृती स्मरणात राहत असल्याचे प्रतिपादन नगर बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले. साकतखुर्द (ता. नगर ) येथे भानुदास चितळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ साकत विद्या प्रसारक संस्थेच्या प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी नगर श्रीगोंदा विधानसभा राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दादा दरेकर यांनी शाळेतून उद्याचे भविष्य घडणार असून शाळेचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. साकत विद्या प्रसारक संस्थेचे सचिव प्रा. विठ्ठल वाघमोडे यांनी प्रस्ताविकातून संस्थेचा लेखाजोखा मांडला.
याप्रसंगी सभापती अभिलाष घिगे व राष्ट्रवादीचे दादा दरेकर यांनी शाळेसाठी प्लेव्हिंग ब्लॉक, खडी देण्याचे आश्वासन दिले. तसेच रामदास चितळकर यांनी भानुदास चितळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेला झाडांची रोपे व 11हजार रुपयांची देणगी दिली.
यावेळी पोलीस पाटील दत्तात्रय चितळकर, उपसरपंच बाबासाहेब चितळकर, भाऊसाहेब मुंगसे, बाप्पू केदारे, पोपट पवार, से. सो. अध्यक्ष अशोक शिंदे, माजी सरपंच श्रीधर पवार, रामदास चितळकर, रामदास दरेकर, बापू निमसे, शरद निमसे, शेखर बोचरे, शिक्षिका घंगाळे मॅडम यासह सर्व अजीमाजी ग्रामपंचायत सद्स्य, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्रा. विठ्ठल वाघमोडे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here