दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार असणा-या आरोपीसह वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून लुटमार करणारे आरोपी  पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगितले जात आहे . सुरेश रणजित निकम, सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव या तिघांना पकडण्यात आले आहे.
यापूर्वीच विकास बाळू हनवत, करण नवनाथ शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 23 एप्रिल रोजी मित्रासह गोरक्षानाथ गड, मांजरसुंबा येथे त्यांची ( एमएच16 सीबी 3328) या दुचाकीवरुन वांबोरीफाटा मार्गे जात असतांना गोरक्षनाथ गडाच्या चढावर दुचाकीचा वेग कमी झाला. त्यावेळी घजालानी यांच्या समोरुन दोन व पाठीमागुन दोन असे एकूण 4 अज्ञात इसम दोन दुचाकीवरुन त्यांच्याजवळ येऊन त्याच्या मित्रास मारहाण करुन घजालानी  व त्याचा मित्राजवळील 3 मोबाईल व सोने चांदीचे दागिणे असा एकूण 1 कोटी 16 लाख 5 हजार रु. किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेबाबत  एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितीक प्रेमचंद छजलानी (वय 20 वर्ष रा. पंचशीलनगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. 254/2021 भादवि कलम 394, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी आरोपी  विकास हनवत, करण शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पो.स्टे. ला हजर केलेले आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश निकम हा फरार झालेला होता. या फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या पथकाच्या मदतीने शोध घेत असताना श्री कटके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली, आरोपी सुरेश निकम हा कात्रड येथे त्याचे घरी आला आहे. त्यानुसार श्री कटके यांनी त्यांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने आरोपी रहात असलेल्या परिसरात सापळा लावला असता सदर आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळून जावू लागला. त्यावेळी पथकातील पोलीसानी आरोपीचा पाठलाग करुन आरोपी  सुरेश रणजित निकम यास ताब्यात घेतले.
त्यास विश्वासात घेऊन सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वसात घेऊन कसून व सखोल चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा यापूर्वी अटक करण्यात आलेले साथीदार तसेच सतिष बर्डे व सागर जाधव अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यावरुन पथकाने आरोपींचा शोध घेऊन आरोपी   सतिष अरुण बर्डे,  सागर शिवाजी जाधव यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई  गणेश इंगळे, पोहेकॉ  दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना  सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, संदीप पवार, दिनेश मोरे, दिपक शिंदे, पोकॉ मच्छिन्द्र बर्डे, रविन्द्र घुंगासे, संदीप दरंदले, योगेश सातपूते, जालिंदर माने आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment