कोरोना काळातही ग्रामीण भागात पोस्ट कार्यालयाची अविरत सेवा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

कोरोना काळातही ग्रामीण भागात पोस्ट कार्यालयाची अविरत सेवा

 कोरोना काळातही ग्रामीण भागात पोस्ट कार्यालयाची अविरत सेवा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मागील दीड वर्षांपासून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. परंतु अशा आणिबाणीच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयाची अविरत सेवा सुरु असल्याने सामान्य जनतेला आधार मिळत आहे.
अहमदनगर डिव्हीजनमधील कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. सामान्यांची टपाल पार्सल व त्याचबरोबर पोस्टाने येणारे एटीएम, चेक बुक, महत्वाची कागदपत्रे वेळेवर पोहोच करुन सामान्यांना आधार देत आहेत. सध्या कोरोनामुळे बरेचसे आर्थिक व्यवहार ऑनलाईनच होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एटीएम व चेक बुकचा मोठा आधार ठरत आहे. मुख्य पोस्टातून आलेल्या थैल्या एस.टी. बससेची सोय नसतानाही सब पोस्टमधून सर्वजण ब्रॅन्च ऑफिसला घेऊन स्वत: घेऊन जातात. व येथून सर्व खेड्यापाड्यात-वाडीवस्तीवर सर्व टपाल व कागदपत्रे सॅनिटाईझ करुनच ग्रामस्थांना वाटप केले जाते. त्यामुळे कर्मचार्यांबरोबरच ग्रामस्थांचाही कोरोना धोका टाळला जातो. प्रत्येक गावात इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत ग्रामस्थांचे खाते असूनही त्यांचेही काम हे कर्मचारी करत आहेत.
यासाठी ऑलइंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सेक्रेटरी संजय परभणे, अध्यक्ष संजय लंके, माजी सेक्रेटरी नईम जहागिरदार, सोसायटी सेक्रेटरी राजेंद्र गवते, कार्याध्यक्ष आनंदराव पवार, आप्पासाहेब डोंगरे आदिंसह सर्व पोस्ट कर्मचारी कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment