तोतया पोलिस पोलिसांकडून गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

तोतया पोलिस पोलिसांकडून गजाआड.

 तोतया पोलिस पोलिसांकडून गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीगोंदा तालुक्यातील प्रमुख रस्त्यावरील वाहनांना थांबून ‘पोलीस’ असल्याची बतावणी करून वाहनातील रक्कम लुबाडणार्‍या अबालू जफर इराणी वय 47 वर्ष, रा. शिवाजीनगर पुणे यास पाठलाग करून श्रीगोंदा पोलिसांनी पकडले असून हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उजेडात येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्याला 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर घटनेची हकीकत अशी, लखन दशरथ नायर वय 21 वर्षे,व्यवसाय ड्रायव्हर रा.बागवा ता.जि.खरगोन(मध्यप्रदेश) हे त्यांची आयशर टेम्पो क्रमांक एम.पी.09आय.एफ.9435 मध्ये दौंडकडुन अहमदनगर कडे जात असताना निमगाव खलु जवळ शांताई लॉन्स समोर तिन अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वरुन येवुन आयशर रोडच्या कडेला थांबवुन चालकास बोलवण्यात गुंतवुन आम्ही पोलिस आहोत असे सांगून एकाने टेम्पोतील क्लिनर साईडने आत मध्ये जावुन सीटखाली ठेवलेली रोख रक्कम 27हजार रुपये  चोरुन नेले होते. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीपैकी एक आरोपी मोटार सायकलवर काष्टी मध्ये आल्याची माहिती मिळाली त्यावरुन त्याचा पाठलाग श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत असताना त्याची मोटार सायकल मांडवगण कडे जाताना मांडवगण चौकी शिरुर पो.स्टे.कर्मचार्‍यांच्या मदतीने पकडुन त्यास विचारपुस केली असता त्याचे नाव अबालु जाफर ईरानी वय 47 वर्षे,रा.शिवाजीनगर ता.जि.पुणे असे सांगितले. त्याचेकडे सखोल विचारपुस करुन तपास केला असता त्याने त्यांचे दोन साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली .
या आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी आठ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली यमाहा एफ झेड कंपनीची मोटार सायकल तिचा आर टी ओ नं.एम.एच.14 जे.जे.5067 जु.वा.किं.50,000/-रु.असा एकुण 58,000/रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली आहे.आरोपीस दि.11/6/2021 रोजी अटक करुन मा.न्यायालयाने दि.16 जून पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.त्याचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द पुणे,नाशिक,अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment