शिक्षकेतर सभासदांच्या वारसांना मयतनिधीची तरतूद करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

शिक्षकेतर सभासदांच्या वारसांना मयतनिधीची तरतूद करावी

 शिक्षकेतर सभासदांच्या वारसांना मयतनिधीची तरतूद करावी

माध्यमिक शिक्षक सोसायटीत विरोधी संचालक व सभासदांचे निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मयत झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सभासदांच्या वारसांना त्यांच्या हक्काची शेअर्स, कायमठेव व वर्गणीची रक्कम द्यावी आणि सोसायटीत होणारा अनावश्यक खर्च टाळून मयतांच्या वारसांना मयतनिधीसाठी तरतूद करण्याच्या मागणी परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालक व सभासदांनी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीकडे केली. या मागणीचे निवेदन सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद अर्जुन भुजबळ, श्रीराम खाडे, दत्तात्रय कसबे आदी उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची सभा दि.27 जून रोजी होणार आहे. या सभेच्या विषय पत्रिकेतील विषय क्रमांक 9 नुसार 2021-22 आर्थिक वर्षासाठी तरतुदीबाबत विचार करणे, या विषयाला अनुसरून माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अनेक सभासद बंधु-भगिनी कोरोना व इतर कारणांनी मयत झाले आहेत. पूर्वीचे 65, कोरोना व इतर कारणांमुळे मयत झालेले अंदाजे 140 सभासद आहेत. मयत सभासदांच्या घरातील कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा व उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झालेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. काही मयत सभासदांना पेन्शनही लागू नाही. शासनाची पीएफची रक्कम काढण्याची बीडीएस प्रणाली बंद आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पगाराव्यतिरिक्त इतर कोणतेही फरक बिल मिळण्यासाठी शासकीय अनुदान उपलब्ध नाही. त्यामुळे मयत बंधू-भगिनींचे कोणत्याही स्वरूपाचे फरक बिले मिळणे आता तरी शक्य नाही. मयतांच्या घरातील इतर सदस्यांचा सांभाळ करणे त्यांच्या दृष्टीने फार जिकिरीचे काम बनले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन मयत सभासद जेंव्हापासून सेवेत हजर झाले, तेंव्हापासूनची कायम ठेव, शेअर्स, वर्गणी सोसायटी कडे जमा आहे. सर्वांची ती हक्काची रक्कम त्यांना त्वरित मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मागील कार्यकारी मंडळाच्या बैठकित सत्ताधारी संचालक मंडळाने सभासदांची मागणी नसताना पारनेर व नेवासा येथील सोसायटीच्या शाखेसाठी जागा खरेदी, बांधकाम, फर्निचर व इतर वेगवेगळ्या स्वरूपाच्या कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी आहे. सदरचे अनावश्यक खर्च न करता व इतर अनावश्यक खर्च टाळून मयतांच्या वारसांना मयतनिधीची तरतूद करण्याच्या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने माध्यमिक शिक्षक सोसायटीत देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here