महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हांडे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हांडे यांची निवड

 महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हांडे यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हांडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. दत्तात्रय हांडे मागील 25 वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. पतसंस्था कर्मचार्‍यांचे विविध मागण्या सोडविण्यासाठी ते नेहमीच अग्रभागी असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पतसंस्था कर्मचारी संघटनेची वार्षिक सभा नुकतीच ऑनलाईन झूम पद्धतीने मा.अध्यक्ष दत्तात्रय हांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
यावेळी संघटनेच्या नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. संघटनेचे राज्य सचिव  ऍड सुधीर टोकेकर यांनी सभेपुढे असलेले सर्व विषय मांडले त्यावर साधकबाधक चर्चा होऊन सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. सभेसाठी सर्व सभासद ऑनलाइन उपस्थित होते.यावेळी पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी म्हणून अध्यक्ष श्री.दत्तात्रय हांडे यांची ,राज्य सचिवपदी
ऍड.सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षपदी राजेंद्र भालेराव, उपाध्यक्षपदी हमीद जमादार, किसन व-हाडे, कु.स्मिता पोहेकर,संदिप दातीर,मोहन देशमुख, सुरेश घोलप यांची तसेच सहसेक्रेटरी संतोष ठुबे, कारभारी फाटक, पोपट भोसले, किरण खिलारी यांची खजिनदारपदी विलास रासकर,राज्य संघटक काँ. सुरेश पानसरे,प्रसिद्धी प्रमुख गंगाधर धावडे तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून संदीप जाधव, प्रशांत पायमोडे, अशोक पाटोळे, तुषार दारके,दत्तात्रय आढाव, शरद गागरे,रमजान पठाण, योगेश पाटसकर यांची निवड करण्यात आली.
कोरोनाच्या या भयावह परीस्थितीमध्ये पतसंस्था कर्मचार्‍यांचे लसीकरण होण्यासाठी संघटनेने शासकीय पातळीवर प्रयत्न केल्याने ग्रामीण भागातील अनेक कर्मचार्‍यांना लस घेता आल्या.
राज्यभरातील पतसंस्था कर्मचार्‍यांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे अध्यक्ष दत्तात्रय हांडे व जनरल सचिव सुधीर टोकेकर यांनी यावेळी सांगितले.संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील पतसंस्था कर्मचार्‍यांना न्याय्य असे व्यासपीठ उपलब्ध झाले असुन जास्तीत जास्त कर्मचार्‍यांनी संघटनेचे सभासदत्व घ्यावे व संघटनेस बळकटी प्राप्त होण्यास सहकार्य करावे असे आवाहन नुतन पदाधिकार्‍यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment