इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन अलकाझारचे अनावरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन अलकाझारचे अनावरण

 इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन अलकाझारचे अनावरण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
मास मार्केट ब्रॅड दरम्यान विक्री पश्चात उत्तम सेवा देणार्या व सलग तीन वर्षे ग्राहकांची प्रथम पसंती ठरलेल्या ह्युंदाई कंपनीच्या नवीन अलकाझारचे अनावरण इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये दिमाखदार सोहळ्यात अनावरण झाले. यावेळी डॉ. विजय सोनार व शोरुमचे संचालक विजयकुमार गडाख आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर व कार प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन अलकाझार सहा व्हेरीएंट व आठ आकर्षक रंगात तसेच सहा व सात सीटर पर्यायमध्ये उपलब्ध आहे. या गाडीत एनयू 2 ली. पेट्रोल एमपीआय इंजिन दिलेले असून, सेगमेंट मधील उत्कृष्ट मायलेज  14.5 कि.मी. प्रति ली. (एमटी) व 14.2 कि.मी. प्रति ली. (एटी) आहे. अत्यंत  वाजवी दरात ग्राहकांना या सेगमेंट मध्ये आलेल्या या उत्कृष्ट सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्या सुविधा इतर कंपनीच्या वाहनामध्ये नसल्याचा दावा ह्युंदाईने केला आहे.
नवीन अलकाझार मध्ये व्हाईस एनेबल स्मार्ट पॅनोरोमिक रुफ, ब्ल्यू लिंक कनेक्टेड कार 60 कनेक्टेड कार वैशिष्टये (ओटीए फिचर सह) (फस्ट ईन सेगमेंट), प्रीमियम कॉगनॅक ब्राऊन ड्युअर टोन इन्टेरिअर्स, 26.03 सेमी (10.25 इंच) मल्टी डिसप्ले डिजिटल क्लस्टर (फस्ट ईन सेगमेंट), 64 कलर्स अ‍ॅबीअंट लाईटींग (बेस्ट ईन सेगमेंट), सेकंड रो टीप अ‍ॅण्ड टंबल कॅपटण अ‍ॅड स्लिप्ट सीटस (बेस्ट ईन सेगमेंट), पॅडल शिफ्टर, सेकंड रो प्रीमीयम कन्सोल विथ स्मार्ट फोन वायरलेस चार्जर, ऑटो हेल्दी एअर प्युरीफायर विथ एक्यूआय डिस्प्ले, ब्लाइंड व्ह्यू मॉनीटर बीव्हीएम, सिग्नेचर कास्केडिंग ग्रील, सराऊंड व्ह्यू मॉनीटर आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ग्राहकांसाठी पाच वर्षापर्यंतची वंडर वॉरंटी, तीन वर्षाची फ्री ब्ल्यु लिंक सब्स्क्रीपशन, लो मेन्टेनन्स कॉस्ट, पिकअप व ड्रॉप सुविधा व तीन वर्ष रोड साईड असिस्टन्स मोफत सवलती देण्यात आल्या आहेत. या गाडीची एक्स शोरुम किंमत व्हेरीएंट नुसार 16 लाख 30 हजार 300 रुपये पासून 19 लाख 99 हजार 900 रुपये पर्यंत आहे. या कारच्या बुकिंगसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलकाझार टेस्ट ड्राईव्हसाठी शोरुममध्ये उपलब्ध असल्याची माहिती जनरल मॅनेजर राजू बेजगमवार व सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here