वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश! पारनेर येथील नियाज राजे यांनी दिली तुळशीचे रोपे भेट! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश! पारनेर येथील नियाज राजे यांनी दिली तुळशीचे रोपे भेट!

 वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश!

पारनेर येथील नियाज राजे यांनी दिली तुळशीचे रोपे भेट!



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

आपला वाढदिवस साजरा करताना तो नेहमीच पर्यावरण पुरक असला पाहिजे या विचाराचे असलेले पारनेर येथील संभाजीनगर परिसरातील होतकरू नेतृत्व नियाज राजे यांनी वृक्षारोपण करून तसेच संभाजीनगर परिसरात औषधी व धार्मिक महत्त्व असलेल्या तुळशीच्या रोपांचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. 

यावेळी अहमदनगर जिल्हा परिषद कृषी व बांधकाम समितीचे सभापती श्री काशिनाथ दाते सर यांचे हस्ते तुळशीच्या रोपांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी एस टी कर्मचारी सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष बलभिम कुबडे, सदस्य तुराब राजे, पारनेर मनसे शहराध्यक्ष वसिम राजे, राजेंद्र घोंगडे, डॉ प्रशांत गाडगे, मंगेश दाते, उद्योजक मयूर महांडुळे, रियाज राजे, सुनिल गाडगे, किरण कुबडे, शहाजी थोरात, अजय घोंगडे, महेंद्र मगर, अय्याज राजे, महेश ठुबे, सियाज राजे, सुहास शिंदे, अश्विन कोल्हे, सनी शेळके, पार्थ फापाळे, श्रीकांत गायकवाड, अभिनंदन घोलप, सनी थोरात, तुषार कुबडे,प्रथमेश गाडगे, रेहान राजे, आवेज राजे, जुनेद राजे व संभाजीनगर परिवारातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री काशिनाथ दाते सर म्हणाले यावर्षी आपणा सर्वांना कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. नियाज राजे यांनी संभाजीनगर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देणारे तुळशीचे रोप भेट देऊन तसेच वृक्षारोपण करुन आपला वाढदिवस खरोखरच पर्यावरणपुरक साजरा केला आहे. तो समाजासाठी व विशेष करून तरुणांसाठी एक दिशा दर्शक आहे.

        तसेच दरवर्षी प्रमाणे जिजामाता विद्यालयाच्या परिसरातील आनंद चिंचबन येथे सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतीफ राजे  यांच्या  मार्गदर्शनात "माझी वसुंधरा माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व नियाज राजे यांच्या  वाढदिवसानिमित्त चिंचांच्या रोपांची लागवड करण्यात आली. याठिकाणी मागील तीन वर्षांपासून नियाज राजे व इतर अनेक जणांच्या वाढदिवसा निमित्त चिंच रोपांची लागवड व त्याचे शंभर टक्के संवर्धन केले जात आहे. यावेळी नियाज राजे, किरण कुकडे, सुनिल गाडगे व मित्र परिवाराने लागवड केलेल्या रोपांसाठी ट्री गार्डची व्यवस्था करुन ते उपलब्ध केले.

No comments:

Post a Comment