उद्यापासून मूक आंदोलन
मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजे आक्रमक.
परवा ओबीसींचा आरक्षणासाठी रस्ता रोको.
मुंबई - एकीकडे मराठा आरक्षणासाठी उद्या अर्थात 16 जूनपासून मूक मोर्चांना सुरुवात होत असताना, तिकडे ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परवा म्हणजे 17 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्ह्याभरात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. उद्यापासून होणार्या मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची भूमिका आणि दिशा संभाजीराजे यांनी आज स्पष्ट केली आहे. आज त्यांनी कोल्हापुरात त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला.
उद्या होणार्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर जाऊन उद्याच्या आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट केली. यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन देखील केलं आहे. आरक्षण देण्याची जबाबदारी सर्व आमदार, खासदारांची आहे. उद्याच्या आंदोलनाचं सर्व लोकप्रतनिधींना निमंत्रण दिलं आहे.लोकप्रतिनिधींचा आदर राखून आंदोलन करा, त्यांच्यासोबत वाद घालू नका, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं. आंदोलनात सहभागी होणार्यांनी कुणालाही उलटसूलट बोलू नये. आंदोलनात सहभागी होणार्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन संभाजीराजे यांनी केलं. उद्या अतिशय शांततेमध्ये आंदोलन करायचं असून आंदोलनाची सुरुवात करण्याचा मान कोल्हापूरला असल्याचं देखील संभाजीराजे म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले.
No comments:
Post a Comment