वाढदिवसा दिवशी अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांचा चिमटा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

वाढदिवसा दिवशी अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांचा चिमटा..

 वाढदिवसा दिवशी अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांचा चिमटा..

प्रिया अण्णा.. तुम्ही आता गप्प का?


मुंबई -
प्रिय अण्णा..प्रचंड महागाई , पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांबद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे म्हणत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाजसेवक अण्णा हजारेंना चिमटा घेत शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सतत सामाजीक प्रश्नांवर आंदोलनाचे ह्त्यार उपसणारे अण्णा हजारे आता गप्प का, असे लक्षात आणून देण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरीत्या केले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस आहे. अनेक राजकिय नेत्यांनी अण्णा हजारे यांना शुभेच्छा दिल्या. अण्णा हजारे आणि आंदोलन हे समीकरण फार मिळत जूळत आहे. तत्कालीन यूपीए सरकार असतांना अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलने केली. महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी हे त्यांच्या आंदोलनाचे मुख्य विषय होते. जंतर-मंतर वर त्यांनी केलेल्या उपोषणामुळे काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर भाजपा सेत्तेत आल्यानंतर आण्णांची भुमिका बदलली का? अशी टीका त्यांच्यावर सतत होत असते. जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना चिमटा घेत शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here