’मविआ’ने परीक्षा रद्द केल्या तेव्हा विरोध करणारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 2, 2021

’मविआ’ने परीक्षा रद्द केल्या तेव्हा विरोध करणारे

 ’मविआ’ने परीक्षा रद्द केल्या तेव्हा विरोध करणारे

भाजप नेते मोदींना प्रश्न विचारणार का ः सचिन सावंत

मुंबई ः  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंगळवारी सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर निशाण साधला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी एप्रिल महिन्यात राज्य सरकारला दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलाव्यात आणि परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर परीक्षा घ्याव्यात असा सल्ला दिला होता. यावरून सचिन सावंत यांनी जोरदार निशाण साधला आहे.
भाजपाच्या मागण्या स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्य करीत नाहीत. गतवर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला त्याला महाराष्ट्र भाजपने विरोध केला. कोरोना पदवीधर असे नाव दिले. आता मोदी यांनी उइडए च्या परीक्षा रद्द केल्या. यावर आशिष शेलार यांचं मत काय? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. विरोधाला विरोध करणार्‍या महाराष्ट्र भाजप नेत्यांना जनता गांभीर्याने घेत नाही. राज्य सरकारने सर्व संबंधित घटकांशी चर्चा केली. असं असताना सरकारचे काही स्वतःचे मत आहे का? हा मविआला विचारलेला प्रश्न मोदींना विचारा ज्यांनीही सर्वांशी चर्चा केली असे म्हटले आहे, असं सचिन सावंत म्हणाले.
भाजपा शासित राज्ये परीक्षा घ्या म्हणत होती. प्रियांका गांधी असतील, मविआ सरकार असेल किंवा काँग्रेस शासित राज्ये असतील, परीक्षा घेऊ नये असे सांगत होती. राज्यातील भाजपने गतवर्षी परीक्षा घ्या असं म्हटलं आता पुढे ढकला म्हणत होते. भाजप नेत्यांना केवळ राजकारण करायचं आहे, अशी टीका देखील सचिन सावंत यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment