प्राचार्य बाळासाहेब कांडेकर सेवानिवृत्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 2, 2021

प्राचार्य बाळासाहेब कांडेकर सेवानिवृत्त

 प्राचार्य बाळासाहेब कांडेकर सेवानिवृत्त


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पिंपळगाव माळवी ः विद्यार्थी हाच देशाचा भावी आधारस्तंभ असून शिक्षक या विद्यार्थीना योग्य दिशा दाखवून देशाच्या विकासात मोलाचा हातभार लावतात असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले .राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब कांडेकर हे आपल्या 32 वर्षांच्या सेवेनंतर 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. यावेळी बोलताना कदम म्हणाले की ,प्राचार्य कांडेकर यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे करून विद्यालयातील विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार केले.
  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोरख काका मुसमाडे मच्छिंद्र कदम अर्जुन मुसमाडे  उपमुख्याध्यापक सुधाकर आल्हाट, पर्यवेक्षक बाबासाहेब चव्हाण ,गोरक्षनाथ रेपाळे ,विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना प्राचार्य कांडेकर म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर देखील विद्यालय ,संस्था व समाजासाठी योगदान देण्याचा निश्चितच  प्रयत्न करील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here