‘लॉग मार्च’ हे शेवटचे अस्त्र ! - खा. संभाजीराजे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

‘लॉग मार्च’ हे शेवटचे अस्त्र ! - खा. संभाजीराजे

 ‘लॉग मार्च’ हे शेवटचे अस्त्र ! - खा. संभाजीराजे

मराठा क्रांती मूक आंदोलनास मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


कोल्हापुर-
‘लाँग मार्च’ काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे, शेवटचे अस्त्र आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की, समाजाला वेठीस धरायचं नाही म्हणून आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. मी बोललोय, आमचा लाँग मार्च काढण्याचा विचार आहे, आम्हाला 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा जायचं नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू’  ‘राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचं स्वागत आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ’, असं सांगून खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला.
‘आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. पण, त्याबद्दल फारसं कुणी बोललं नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे’ असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
‘पण मी चर्चेसाठी एकटा जाणार नाही. अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं. आम्ही आमच्या आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते’ असा खुलासाही संभाजीराजेंनी केला.
‘ नऊ दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचं स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे. आम्ही सुद्धा माणसं आहोत, विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्यवकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावं, आपण मार्ग काढूया’ असंही संभाजीराजे म्हणाले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा असा आहे. मी ही भूमिका घेतली होती. ती पटवून देण्याचा प्रयत्नही केला होता. आता ही भूमिका सगळ्यांना पटत आहे. ही चांगली गोष्ट आहे. मराठा आरक्षणासाठी भाजप आणि काँग्रेसने आधीपासूनच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता तरी मराठा आरक्षणासाठी जे जे पर्याय आहेत, त्याचा अवलंब केला पाहिजें. आजच्या मराठा आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहेच. शिवाय ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्नही सरकारने सोडवला पाहिजे
- प्रकाश आंबेडकर, नेते वंचित बहुजन आघाडी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती केली पाहिजे. राज्यातील 48 खासदारांनी पंतप्रधानांकडे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या पक्षाकडे बहुमत आहे. शिवाय त्यांनी अन्य राज्यांना यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न गरजेचे आहेत. केवळ संभाजीराजे छत्रपती हे एकटे काही करू शकणार नाही. त्यांना सामूहिक ताकत मिळाली पाहिजे महाराष्ट्राने एकत्र येऊन आमदार, खासदारांनी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला पाहिजे. संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकट्यावरच जबाबदारी टाकणं आणि त्याने सर्व करणं अशक्य आहे. त्यामुळे खासदार आणि मंत्रीमंडळाने दिल्लीत विषय पोहोचवला पाहिजे. तसंच फक्त मोदींकडे विषय मांडून चालणार नाही. पंतप्रधान म्हणतील मी काय करु, बाकीच्यांचं मत काय माहिती नाही, असं चालणार नाही. बहुमतासाठी लॉबिंग करावं लागेल.
- श्रीमंत शाहु महाराज

आज सकाळी 8 वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले होते. त्यानंतर 10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचं दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं. कोणतीही कुणकुण नसताना प्रकाश आंबेडकर या मोर्चात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संभाजीराजे आंबेडकरांना भेटले होते. त्याचवेळी आंबेडकरांनीही मोर्चात येण्याचं ठरलं होतं असं सांगितलं जातं. मध्यंतरी संभाजीराजे यांनी नव्या राजकीय पक्षाचे संकेत दिले होते. त्यामुळे आंबेडकर आणि संभाजीराजे राज्यात नवं राजकीय समीकरण निर्माण तर करणार नाही ना याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

No comments:

Post a Comment