‘सांदण दरीत’ जाण्यास वनखात्याकडून पर्यटकांना बंदी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 12, 2021

‘सांदण दरीत’ जाण्यास वनखात्याकडून पर्यटकांना बंदी

 सांदण दरीत’ जाण्यास वनखात्याकडून पर्यटकांना बंदी


अकोले :
‘सांदण दरी येथे जाण्यास पर्यटकांना बंदी घातली असून या भागात कुणी जाणीवपूर्वक जाण्याचा प्रयत्न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे,’ अशी माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आहे .या परिसरात जोरदार पाऊस होत असून दरीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. नुकतेच येथे काही पर्यटक उतरले होते, व त्यात ते अडकले. या पर्यटकांना वनविभाग कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी यशस्वी ऑपरेशन करून दरीतून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे .या घटनेनंतर वनविभागाने या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे.
सांदण दरीचे दरीचे वैशिष्ठ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे, जो कधीही आटत नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ 1 कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते, कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.  दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पूल लागतात. पहिला पुल 2-4 फुट अन दुसरा पुल 4-6 फुट पाण्यात असतो. येथे हिवाळ्यात पण जाऊ शकतो, पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते. सांदण दरीला जाण्यासाठी जाण्यासाठी साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आशिया खंडातील दोन नंबरची व्हॅली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here