क्रेडाई अहमदनगरच्यावतीने कोविड जनजागृती अभियानांतर्गत 5 हजार मास्क व सॅनिटायझर पेनचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

क्रेडाई अहमदनगरच्यावतीने कोविड जनजागृती अभियानांतर्गत 5 हजार मास्क व सॅनिटायझर पेनचे वाटप

 क्रेडाई अहमदनगरच्यावतीने कोविड जनजागृती अभियानांतर्गत 5 हजार मास्क व सॅनिटायझर पेनचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी प्रत्येकाने आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षितीतेसाठी कोविड नियमांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्कचा वापर ही त्रिसूत्री प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहे. प्रत्येकाने जबाबदारी समजून या नियमांचे पालन करावे, असे आवाहन क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा यांनी केले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर क्रेडाई अहमदनगरने आपले सभासद, त्यांचे कुटुंबिय, कार्यालयीन कर्मचारी, साईटवरील कामगार यांना के्रडाई ब्रॅण्डेड मास्क आणि सॅनिटायजर पेनचे वितरण सुरु केले आहे. या वितरणाचा शुभारंभ राखी राहुल पितळे, रिधी राहुल पितळे, निदीश राहुल पितळे, गौरव अशोक पितळे,  यांच्या  हस्ते करण्यात आला. यावेळी क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, खजिनदार प्रसाद आंधळे,क्रेडाई वुमेन्स लीगच्या अध्यक्ष सोनाली मुथा, राजश्री आंधळे, युथ विंगचे गौरव पितळे आदी उपस्थित होते.
क्रेडाई अहमदनगर अंतर्गत क्रेडाई वूमन्स विंग, क्रेडाई युथ विंग हा उपक्रम राबवित आहे. यात जवळपास 5 हजार मास्क आणि सॅनिटायजर पेन वाटप करण्यात येत आहे. क्रेडाई ब्रॅण्ड असलेले मास्क दर्जेदार असून पेनच्या एका बाजूला सॅनिटायझर असल्याने ते सहज वापरता येणे शक्य आहे. क्रेडाई अहमदनगरची नूतन कार्यकारिणी एप्रिल मध्ये जाहीर झाली. कोविड मुळे पदग्रहण सोहळा न करता याच कार्यक्रमासाठी लागणार्या खर्चाची बचत करून कोविड काळात जागृती व साहित्य वाटप उपक्रम राबविल्याचे मुथा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment